IND vs AUS T20I Series Live Streaming Details in Marathi: एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. तर अखेरचा सामना ८ नोव्हेंबरला गाबाच्या मैदानावर होणार आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या दृष्टीने ही टी-२० मालिका महत्त्वाची असू शकते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ टी-२० मालिका खेळणार आहे. तर यापूर्वी शुबमन गिलने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका गमावली. पण या वनडे मालिका पराभवाचा बदला टी-२० मालिकेत विजय मिळवणार घेण्यावर असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी खेळवले जातील. १.१५ वाजता नाणेफेक होऊन सामने दुपारी १.४५ वाजता सुरू होतील. पहिला सामना २९ ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने कॅनबेरामध्ये सरावाला सुरूवात केली आहे.
एकदिवसीय मालिकेप्रमाणेच भारतीय संघाचे सामने स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. तर मोबाईलवर हे सामने जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येतील. भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० सामना सुरू असताना महिला वनडे वर्ल्डकपमधील पहिली सेमीफायनल सामनाही दुपारी ३ पासून खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल.
भारत-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
गेल्या १८ वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियाने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या ३२ सामन्यांपैकी २० सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर ११ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ राहिली आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर टीम इंडिया इथेही ऑस्ट्रेलियापेक्षा पुढे असल्याचे दिसून येतं.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १२ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ७ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने फक्त ५ सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा टी-२० मालिकेसाठी संघ
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, जोश फिलिपी, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस
भारताचा टी-२० मालिकेसाठी संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू
