अहमदाबाद कसोटीत काल तिसऱ्या दिवशी भारताने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताच्या फलंदाजांनी दिवसभर दमदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या होत्या. फलंदाजी अनुकूल असली तरी भारताच्या फलंदाजीनेही निराशा केली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३ गडी गमावून २८९ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा भारतासाठी फलंदाजीची सलामी देतील, तिसऱ्या दिवशी दोन्ही फलंदाज नाबाद परतले.

तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान विराट कोहली ४२ धावा करून खेळत असताना सामना काही काळ थांबला आणि कोहलीने बॅट जमिनीवर ठेवून विश्रांती घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि बॅट उचलतो आणि ती तपासू लागतो. यादरम्यान कोहली आणि स्मिथमध्ये काही संवादही झाला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. “नाहीतरी रडीचा डाव खेळण्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू हुशार आहेत,” असे एका चाहत्याने सोशल मीडियावर कमेंट केली.

विराट ५९ धावांवर नाबाद

चेतेश्वर पुजाराची विकेट पडल्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने आज जबरदस्त फलंदाजी केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट कोहली ५९ धावांवर नाबाद आहे. विराटने १२८ चेंडूत ५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच शानदार चौकारही मारले. अशा स्थितीत विराट उद्या शतक झळकावेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: ‘वडापाव नही तो समोसा सही!’ बाद झाल्यानंतर कर्णधार रोहितला स्टेडियममध्ये समोसा खाताना पकडले?

टीम इंडिया १९१ धावांनी मागे

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८८ धावा केल्या होत्या, त्यामुळे टीम इंडिया अजूनही १९१ धावांनी मागे आहे, भारतीय संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या आहेत. विराट कोहली ५९ आणि रवींद्र जडेजा १६ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. अशा परिस्थितीत उद्याही टीम इंडियाकडून मोठी धावसंख्या अपेक्षित आहे.

Live Updates