ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होताना दिसत आहे. त्यातच कर्णधार विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघासमोरील अडचणींमध्ये अधिक भर पडणार आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सुरु होत आहे. या कसोटीत मराठमोळा अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमीची दुखापत या गोष्टींमुळे दुसऱ्या कसोटीसाठी संघनिवडीचा पेच भारतीय संघासमोर आहे.
अवश्य वाचा – बळीचे बकरे शोधू नका ! पृथ्वीच्या खराब कामगिरीवरुन आकाश चोप्राचा टीम इंडियाला सल्ला
अशा परिस्थितीत भारताचा माजी कसोटीपटू आणि मुंबईकर वासिम जाफर अजिंक्यच्या मदतीसाठी धावून आला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर वासिमने एक खास ट्विट करत अजिंक्यला सल्ला दिला आहे. पाहा काय म्हणतोय, वासिम जाफर…
Dear @ajinkyarahane88, here’s a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
LegacyPS: you guys are open to have a go and decode the msg too #INDvsAUS #AUSvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020
हे ट्विट केल्यानंतर वासिमने आपल्या चाहत्यांना या ट्विटमधला छुपा संदेश ओळखून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. वरकरणी पाहता कठीण वाटणारा हा संदेश नीट वाचल्यास जाफरने अजिंक्य रहाणेला दुसऱ्या कसोटीसाठी शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्थानिक क्रिकेटलाही रामराम करणाऱ्या जाफरने गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर मिम स्पेशालिस्ट म्हणून आपली ओळख तयार केली आहे. त्यामुळे जाफरचा हा सल्ला रहाणे ऐकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – फोन बंद करा, संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा ! मोहम्मद कैफचा भारतीय संघाला सल्ला
