IND vs BAN 1st Test Why does not Mahmud Hasan celebrate wicket : बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूद याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या सत्रात तीन विकेट्स घेत चर्चेत आला. या युवा गोलंदाजाला फार उत्साहाने सेलिब्रेशन करायला आवडत नाही. २४ वर्षीय बांगलादेशी गोलंदाजाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिलसारख्या फलंदाजाला बाद केले. त्याचा हा चौथा कसोटी सामना आहे. दिग्गज फलंदाजांना बाद केल्यानंतर तो फार उत्साहाने सेलिब्रेशन करेल, अशी अपेक्षा होती, पण त्याने तसे काहीही केले नाही.

हसन महमूदने भारतीय टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले –

हसन महमूदने फक्त आपल्या संघातील सहकाऱ्यांची गळाभेट घेतली. त्याचबरोबर सहकाऱ्यांसोबत हँडशेकपर्यंतच मर्यादित ठेवले. त्याने पहिल्या दिवसाच्या खेळात पहिल्या तासातच टीम इंडियाची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे विराट-रोहितसारख्या दिग्गज खेळाडूंची विकेट घेतल्यानंतर फार उत्साहाने सेलिब्रेशन सेलिब्रेशन न करत चाहत्यांची मनं जिंकली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर महमूद हसनने सांगितले की त्याने विकेट्स घेतल्यानंतर अति उत्साहाने सेलिब्रेशन का केले नाही? त्याबद्दल जाणून घेऊया.

IND vs BAN Rishabh Pant apologized to Mohammed Siraj video viral
IND vs BAN : मोहम्मद सिराज संतापल्याने ऋषभ पंतला मागावी लागली माफी, नेमकं कारण काय? पाहा VIDEO
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Hasan Mahmud Becomes First Bangladesh Bowler to Take Five Wickets in India in Test IND vs BAN
IND vs BAN: हसन महमूदने भारताविरूद्ध कसोटीत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला बांगलादेशचा पहिला गोलंदाज
India vs bangladesh 1st Test Day 2 Updates in Marathi
IND vs BAN Test Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताने किती धावा केल्या, जाणून घ्या
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Jasprit Bumrah Completes 400 Wickets in International Cricket IND vs BAN 1st test
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान

हसन महमूद विकेट घेतल्यानंतर अति उत्साहाने सेलिब्रेशन का करत नाही?

हसन महमूद म्हणाला, “मी विकेट घेतल्यानंतर अति उत्साहाने सेलिब्रेशन करत नाही आणि तसे न करण्याचे कोणतेही विषेश कारण नाही. तुम्ही असे म्हणू शकता की मी विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केले, तर बाद झालेला फलंदाज आणखी नाराज होईल म्हणून मी तसे सेलिब्रेशन करत नाही.” मात्र, दुसऱ्या सत्रात कोहली आणि रोहित आणि ऋषभ पंतसारख्या फलंदाजांना बाद केल्यानंतर या गोलंदाजाने आनंद व्यक्त केला. महमूद म्हणाला, “मी आनंदी आहे.” या क्षणी जे क्रिकेविश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहेत, त्यांची विकेट्स घेतल्यानंतर तुम्हाला साहजिकच आनंद होईल.”

हेही वाचा – IND vs BAN : ‘माझा मुलगा आज नक्कीच…’, अश्विनच्या वडिलांनी आधीच केले होते भाकीत; दिनेश कार्तिकचा खुलासा

हसन महमूदने नवा इतिहास लिहिला –

पहिल्या दिवशी भारतीय टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करणाऱ्या हसन महमूदने दुसऱ्या दिवशी बुमराहच्या रूपाने त्याची पाचवी विकेट घेण्यात यश मिळविले. अशा प्रकारे या २४ वर्षीय बांगलादेशी वेगवान गोलंदाजाने भारतीय भूमीवर नवा इतिहास लिहिला आहे. तो भारतात कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेणार बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला आहे. हसन महमूदने पहिल्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी करत भारताचे पहिले ४ विकेट्स घेतले होते. ज्यामध्ये त्याने रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि ऋषभ पंतला तंबूचा रस्ता दाखवला.

हेही वाचा – IND vs BAN : अश्विनचा हुरुप वाढवायला आजी सरसावल्या; दिवसभरातल्या प्रत्येक चौकार-षटकाराचं कौतुक, VIDEO व्हायरल

दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात नऊ षटकांत तीन गडी गमावून २६ धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात शदमान इस्लामला क्लीन बोल्ड करत पहिला धक्का दिला. यानंतर, आकाश दीपने लंच ब्रेकपूर्वी लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन आणि मोमिनुल हक यांना बाद केले. सध्या कर्णधार नजमुल हुसेन शांतो १५ धावा आणि मुशफिकर रहीम चार धावांसह खेळत आहेत.