IND vs BAN Kanpur Test WTC Points Table : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. खराब हवामानामुळे सामन्याचा पहिला दिवस वेळेआधीच संपला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना सुरु होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात हा प्रश्न घोळत आहे की, कानपूर कसोटी पावसामुळे रद्द झाली, तर त्याचा डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर काय परिणाम होईल आणि टीम इंडिया फायनलमध्ये जाणार का? सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या पहिल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे कोणाला जास्त फटका बसणार जाणून घेऊया.

डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील दोन्ही संघांची सध्याची स्थिती –

सध्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारत ७१.६७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेशचे ३९.२९ टक्के गुण आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास बांगलादेशपेक्षा भारताचे नुकसान जास्त होणार आहे. वास्तविक, भारत हा कसोटी सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. अशा स्थितीत कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला बांगलादेशसोबत गुण विभागून घ्यावे लागणार आहेत. जर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर, दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ४ गुणांचे वाटप केले जाते, तर विजयी संघाला १२ गुण मिळतात.

सामना होऊ शकला नाही, तर कोणाला जास्त फटका बसणार?

वास्तविक, भारत हा कसोटी सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. अशा स्थितीत कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला बांगलादेशसोबत गुण शेअर करावे लागणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, जर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर, दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ४ गुणांचे वाटप केले जाते, तर विजयी संघाला १२ गुण मिळतात. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास टीम इंडियाच्या खात्यात केवळ ६८.१८ टक्के गुण असतील, तर जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्याचे ७४.२४ टक्के गुण होतील. अशा स्थितीत अनिर्णित राहिल्याने भारताचे मोठे नुकसान होणार आहे.

हेही वाचा – पहिला दिवस पावसाचा; केवळ ३५ षटकांचा खेळ; बांगलादेश ३ बाद १०७

बांगलादेशसाठी काय आहे समीकरण?

बांगलादेशबद्दल बोलायचे, तर कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास त्यांच्या खात्यात ३८.५४ टक्के गुण होतील. जर सामना अनिर्णित न राहता, त्यांनी जिंकला तर त्याचे ४६.८७ गुण होतील. या विजयासह बांगलादेश टॉप-४ मध्ये आपले स्थान निश्चित करू शकतो. जरी त्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे पावसामुळे कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यास भारताचे नुकसान होणार आहे. कारण यामुळे भारताच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना धक्का बसणार आहे.

हेही वाचा – IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा

भारताचा पुढचा प्रवास कठीण होईल –

फायनल सामन्यापूर्वी भारताला आणखी ९ कसोटी सामने खेळायचे आहेत, त्यापैकी टीम इंडियाला किमान ५ सामने जिंकावे लागतील. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीनंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका त्यांच्या घरी खेळायची आहे. कानपूर कसोटी सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला, तर भारताचा पुढचा प्रवास कठीण होईल.

Story img Loader