बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही भारतीय संघाने अप्रतिम गोलंदाजी केली. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती, पण भारताकडून बऱ्याच वेळा गचाळ क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. अक्षर पटेलने तीन फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवले. त्याच्या कामगिरीला यश आले असते, पण विराट कोहलीच्या खराब क्षेत्ररक्षणाचा त्याला फटका बसला. माजी कर्णधाराने खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोहली हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. पण रन मशीनचे ते रूप या सामन्यात पाहायला मिळाले नाही. त्याने लिटन दासचे दोन सोपे झेल सोडले. एवढेच नाही तर चुकीची बाद असल्याची अपीलही केली. ज्यानंतर समालोचकांनी या विषयावर खूप चर्चा केली. मात्र, पंचाचा अंतिम निर्णय नाबाद राहिला. कोहलीचा खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लिटन दासने साकारली महत्त्वपूर्ण खेळी –

बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दासने त्याला मिळालेल्या दोन जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने ९८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याचबरोबर संघाला २०० च्या पुढे नेले. मात्र, मोहम्मद सिराजने त्याच्या एका शानदार चेंडूने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांवर आटोपला –

हेही वाचा – Harris Rauf Wedding: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने क्लासमेटशी केले लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवसापर्यंत यजमान भारताकडून ८० धावांनी पिछाडीवर होते. मात्र लिटन दास आणि झाकीर हसन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे, बांगलादेशचा दुसरा डाव २३१ धावांपर्यंत पोहोचला. ज्यामुळे त्यांना १४४ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारतीय संघाने तिसरा दिवस अखेर २३ षटकांत ४ बाद ४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी चौथ्या दिवशी १०० धावांची गरज आहे.