अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू ‘लिओनेल मेस्सी’ बांगलादेश क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात अचानक दिसला. होय, मेस्सी प्रत्यक्षात आला नसेल, पण शाकिबने त्याची जर्सी घालून फुटबॉल खेळताना दिसला. लिओनेल मेस्सीने अर्जेंटिना संघाला प्रदीर्घ कालावधीनंतर फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला आहे. अर्जेंटिनाच्या विजेतेपदात मेस्सीचा मोलाचा वाटा होता. यावेळी तो अर्जेंटिनात असेल, पण अचानक तो बांगलादेशातील ढाका येथे दिसला. तो स्वतः तिथे पोहोचला नसला तरी त्याची १० क्रमांकाची जर्सी बांगलादेश क्रिकेट संघाच्या शिबिरात पोहोचली जिथे बांगलादेशी खेळाडू सराव करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, बांगलादेश क्रिकेट संघाच्या सराव सत्रादरम्यान शाकिब अल हसनही फुटबॉल सत्रात भाग घेत होता. तेव्हाच संघातील एका सदस्याने त्याला लिओनेल मेस्सीची १० क्रमांकाची जर्सी दिली आणि तो ती जर्सी घालून मैदानात उतरला आणि फुटबॉलला मारताना दिसला. अशा प्रकारे, मेस्सी प्रत्यक्षात नसला तरी तो चाहत्यांच्या मनात दिसला पाहिजे. तसंच काहीसं शाकिब अल् हसनच्या बाबतीत घडलं. कर्णधार शाकिबने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनल मेस्सीची जर्सी घालून सराव केला. यावरून शाकिबही मेस्सीचा फॅन असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू मेस्सीच्या जर्सीतील शाकिबचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना २२ डिसेंबरपासून

भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना (भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी) गुरुवारपासून (२२ डिसेंबर) मीरपूर येथील शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. यजमान बांगलादेशचा संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. सैनीही जखमी झाला आहे.

शाकीब अल हसन दुसऱ्या कसोटीत गोलंदाजी करणार नाही

शाकीब अल हसन दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही. तो या सामन्यात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून उतरणार आहे. बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी याकडे लक्ष वेधले आहे. डोमिंगोने सांगितले की, शाकीब दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून भाग घेईल. शाकिबने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १२ षटके टाकली. दुसऱ्यांदा त्याच्या खांद्याचा त्रास वाढला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban bangladesh captain is fascinated by messi practiced wearing argentina jersey before the second test against india avw
First published on: 21-12-2022 at 11:14 IST