scorecardresearch

Premium

IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची का मागितली माफी? जाणून घ्या कारण

IND vs BAN, ICC World Cup 2023: विराट कोहलीने विश्वचषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले. सलग चौथ्या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड कप २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

IND vs BAN Match Updates, ICC World Cup 2023
विराट कोहली सामनावीर ठरला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja: बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक २०२३च्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना प्रथमच १०० धावांचा टप्पा पार केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशने २५७ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची नाबाद खेळी केली. किंग कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. यानंतर विराट कोहलीने विजयावर आपली प्रतिक्रिया दिली.

विराटने मागितली रवींद्र जडेजाची माफी –

या मॅचविनिंग शतकासाठी कोहलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. विराट जेव्हा त्याचा पुरस्कार घेण्यासाठी आला, तेव्हा त्याने सर्वप्रथम रवींद्र जडेजाची माफी मागितली. पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोहली म्हणाला, “जड्डूकडून सामनावीर पुरस्कार चोरल्याबद्दल मी माफी मागतो.” आपल्या शतकाबाबत कोहली म्हणाला, “मला मोठे योगदान द्यायचे होते. कारण विश्वचषकात मी काही अर्धशतके झळकावली आहेत, पण मी त्यांचे रूपांतर शतकांमध्ये करू शकलो नाही. मला यावेळी सामना संपवायचा होता आणि शेवटपर्यंत टिकायचे होते, जे मी वर्षानुवर्षे केले आहे.”

Baroda fail to take lead against Mumbai in quarter final of Ranji Trophy sport news
मुंबईची पहिल्या डावात आघाडी,बडोदाच्या पहिल्या डावात ३४८ धावा; मुंबई तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २१
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Yashasvi Jaiswal's second consecutive double century against England
IND vs ENG : द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची विराट-कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी, गावसकरांच्या क्लबमध्येही मिळवले स्थान
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”

अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर १३व्या षटकात कोहली क्रिजवर आला, तेव्हा हसन महमूदने सलग दोन नो बॉल टाकत विराटला शानदार सुरुवात करण्याची संधी दिली. यावर तो म्हणाला, “मी शुबमनला सांगत होतो की, अशी परिस्थिती स्वप्नात पाहिली तरी प्रत्यक्षात होईल असे वाटणार नाही. पहिले चार चेंडू, दोन फ्री-हिट, एक षटकार आणि एक चौकार ही माझ्यासाठी स्वप्नवत सुरुवात होती.”

हेही वाचा – IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

खेळपट्टीबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला, “खेळपट्टी खूप चांगली होती आणि मला फक्त माझा खेळ खेळण्याची गरज होती. त्यामुळे फक्त चेंडूला टायम करणे, गॅपमध्ये मारणे, जोरात धावणे आणि गरज असेल तेव्हा चौकार मारणे, यावर माझे लक्ष होते.” बांगलादेशचा पराभव करून भारताने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. संघाची गती चांगली आहे आणि खेळाडूंमध्येही सकारात्मक वातावरण असल्याचे कोहलीने मान्य केले.

आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहोत –

विराट कोहली पुढे म्हणाला, “चेंजिंग रूममध्ये खूप चांगले वातावरण आहे. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहोत. प्रत्येकजण तिथल्या भावना पाहू शकतो. आम्ही समजू शकतो की ही एक मोठी स्पर्धा आहे. तसेच आम्हाला थोडी गती वाढवण्याची गरज आहे. मायदेशात आणि या सर्व लोकांसमोर खेळणे ही एक खास भावना आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ban match updates virat kohli apologized to ravindra jadeja after receiving the man of the match award vbm

First published on: 19-10-2023 at 23:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×