scorecardresearch

Premium

IND vs BAN, Asia Cup: रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला? हिटमॅन म्हणतोय, “या सीरिज मध्ये चेस…”

Rohit Sharma, Asia Cup 2023: आज आशिया चषक २०२३चा शेवटचा सुपर-४ सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेकी दरम्यान रोहित शर्माचे एक वक्तव्य व्हायरल होत आहे.

IND vs BAN: Rohit Sharma forgot the match against Nepal Hitman says, No chase in this Asia Cup series
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)

Rohit Sharma, Asia Cup 2023: शुक्रवारी (दि. १५ सप्टेंबर) आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर-४ फेरीचा सहावा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने असणार आहेत. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, तिलक वर्मा याने या सामन्याद्वारे वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यादरम्यानचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले आहेत. मात्र, नाणेफेकीदरम्यान रोहितने गोलंदाजीचा निर्णय घेताना रात्रीच्या वेळी फलंदाजीचा अनुभव संघाला मिळावा, असे म्हटले. त्यामुळे तो नेपाळ विरुद्धची मॅच विसरला? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने बांगलादेशविरुद्ध आशिया कप २०२३ सुपर-४च्या शेवटच्या सामन्यात पदार्पण केले आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्लेइंग-११ मध्ये ५ बदल केले आहेत. दुसरीकडे, तिलक वर्माला भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. याआधी त्याने टी२० मध्ये पदार्पण केले होते आणि त्यात चांगली कामगिरी केली होती.

ICC action on Wanindu Hasranga
SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला?

टीम इंडियाने जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक अशी होती. मात्र, तरीही भारताचा कर्णधार रोहित शर्माने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे समालोचक रवी शास्त्रींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी जेव्हा रोहितला या निर्णयामागील कारण विचारले तेव्हा तो म्हणाला की, “या मालिकेमध्ये आम्ही आतापर्यंत धावांचा पाठलाग केलेला नाही. लाईटमध्ये आम्हाला आमची फलंदाजी आजमावून पाहायची आहे. कारण, नेहमीच आम्ही नाणेफेक जिंकू आणि प्रथम फलंदाजी येईल असे नाही. तसेच, दिवसा गोलंदाज कशी गोलंदाजी करतात, हे देखील टेस्ट होईल. त्यामुळे मी आधी गोलंदाजी करण्याचा  घेतला आहे.” त्याच्या या विधानावरून चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत की, “रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला?” असे मजेशीर मीम्स बनवत आहेत.

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहितने प्लेइंग-११ मध्ये पाच बदल केले आहेत. विश्वचषक आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला. फायनलपूर्वी हिटमॅनला आपल्या खेळाडूंना ताजेतवाने ठेवायचे आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-११ मध्ये प्रवेश झाला आहे.

श्रेयस अय्यरने नेटमध्ये फलंदाजी केली

श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे कारण, पाठीच्या कठड्यामुळे तो पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या ‘सुपर फोर’ सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, गुरुवारी त्याने नेटमध्ये फलंदाजी केली आणि त्याला कोणतीही अडचण आली नाही, ही संघासाठी चांगली बातमी आहे. परंतु, संघ व्यवस्थापनाला मुंबईच्या या खेळाडूला सावरण्यासाठी काही अतिरिक्त वेळ द्यायचा असेल, त्यामुळे तो इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा विचार करेल. कोणताही एक पर्याय वापरून पाहू शकता.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: भारत ठरला टॉसचा बॉस! रोहितने प्लेईंग-११मध्ये केले ५ बदल; तिलक वर्माचे वन डेत पदार्पण

आतापर्यंत सामन्यात काय झाले?

बांगलादेशची सुरुवात खराब झाली असून नऊ षटकांनंतर त्यांनी तीन गडी गमावत ३६ धावा केल्या आहेत. सध्या मेहदी हसन मिराज ३ धावा करून क्रीजवर असून शाकिब अल हसनने १३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत शार्दुल ठाकूरने दोन आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ban rohit forgot the match against nepal because he said i did not chase in this series thats why i took bowling avw

First published on: 15-09-2023 at 16:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×