IND vs ENG 2nd Test Day 5 Live Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४२७ धावा करत डाव घोषित केला. यासह भारताकडे आता ६०७ धावांची भक्कम आघाडी आहे. यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या अखेरीस ७२ धावा केल्या असून संघाला विजयासाठी अजून ५३५ धावांची गरज आहे. तर भारतीय संघाला विजयासाठी ७ विकेट्सची गरज आहे.

जडेजाच्या खात्यात पहिली विकेट

रवींद्र जडेजाने ६४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विकेट घेत इंग्लंडला नववा धक्का दिला. ब्रायडन कार्सने खेळलेल्या फटक्यावर सिराज डाईव्ह करत कमालीचा झेल टिपला. तर जडेजाला या सामन्यातील पहिली विकेट मिळाली.

आकाशदीपने पहिल्यांदा घेतले ५ विकेट्स

आकाशदीपने जेमी स्मिथला बाद करत भारताला मोठी विकेट मिळवून दिली आहे. आकाशदीपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर स्मिथने २ षटकार लगावले होते. तिसऱ्या शॉर्ट बॉलवर तो पुन्हा षटकार मारायला गेला आणि सीमारेषेजवळ वॉशिंग्टनने कमालीचा झेल टिपला. यासह आकाशदीपने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ५ विकेट घेतले आहेत.

प्रसिद्ध कृष्णाच्या हातात पहिली विकेट

प्रसिध्द कृष्णाला या सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती. त्याच्या गोलंदाजीवरून आणि इकॉनॉमीवरून त्याला ट्रोल केलं जात होतं. पण त्याने दुसऱ्या डावात आता विकेट मिळवली आहे. प्रसिधने ५३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्सला झेलबाद केलं. प्रसिधच्या गोलंदाजीवर सिराजने एक सोपा झेल टिपत दोन्ही हात आकाशाकडे पसरवत विकेटचं सेलिब्रेशन केलं.

वॉशिंग्टन सुंदरने स्टोक्सला केलं बाद

वॉशिंग्टन सुंदरने ४१व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि स्टोक्सला पायचीत करत बाद केलं. स्टोक्स त्याची विकेट पाहून चकित झाला होता. अखेरीस रिव्ह्यू घेतला पण निर्णय मात्र भारताच्या बाजूने लागला. यासह स्टोक्स ३३ धावा करत बाद झाला. इंग्लंडने आतापर्यंत ६ बाद १५३ धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप ४५५ धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ४ विकेट्सची गरज आहे.

बेन स्टोक्स-जेमी स्मिथ भागीदारी

इंग्लंडने 5 विकेट्स गमावल्यानंतर बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ यांनी संघाचा डाव सावरला आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला आहे. इंग्लंडचा संघ संपूर्ण दिवस खेळून काढत सामना ड्रॉ करण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ आता विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

हॅरी ब्रुक आऊट

आकाशदीपने २२व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर ब्रुकला पायचीत केलं. आकाशदीपचा चेंडू ब्रुकच्या मागच्या पायावर जाऊन आदळला. मैदानावरील पंचांनी त्याला LBW बाद दिलं. ब्रुकने रिव्ह्यू घेतला पण निर्णय मात्र भारताच्या बाजूने लागला आणि इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

आकाशदीपच्या खात्यात तिसरी विकेट

आकाशदीपने पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच चौथ्या षटकात संघाला विकेट मिळवून दिली. आकाशने २०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑली पोपला क्लीन बोल्ड केलं. आकाशदीपने कमालीचा चेंडू टाकत त्याला बाद करत तिसरी विकेट मिळवली. यासह इंग्लडने चौथी विकेट गमावली आहे.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू

एजबेस्टन कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. इंग्लंडचे हॅरी ब्रुक आणि ओली पॉपची जोडी मैदानावर आहे. तर प्रसिध कृष्णाला चेंडू सोपवण्यात आला आहे.

किती वाजता सुरू होणार पाचव्या दिवसाचा खेळ?

एजबेस्टन कसोटीत पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मैदानाची पाहणी करून पंचांनी पुढील अपडेट दिले आहेत. भारतीय वेळेनुसार सामना ५.१० वाजता सुरू होणार आहे. तर सामन्याची षटकं कमी होणार असून ८० षटकांचा सामना होणार आहे.

पाचव्या दिवसाचं अपेडेटेड वेळापत्रक

पहिलं सत्र- ५.१० ते ७.००
लंचब्रेक – ७.०० ते ७.४०

दुसरं सत्र – ७.४० ते ९.४०
टीब्रेक – ९.४० ते १०

तिसरं सत्र – १० ते ११.३०

पुन्हा पावसाला सुरूवात

भारत वि. इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन कसोटीच्या अखेरच्या दिवशी मैदानाच्या पाहणीनंतर पुन्हा एकदा पावसाची सर आली आहे. त्यामुळे मैदानावर परत कव्हर्स टाकण्यात आले आहेत.

पावसाची विश्रांती

पावसाने अखेरील विश्रांती घेतली असून ४.३० ला मैदानाची पाहणी केली जाणार आहे आणि त्यानंतर सामना कधी सुरू होईल हे पंच जाहीर करतील.

एजबेस्टन कसोटीच्या अखेरच्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होणार

भारत वि. इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता होती. आता सामना सुरू होण्याआधीच पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होणार असल्याचे अपडेट समोर आले आहेत.

एजबेस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल आणि रवींद्र जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ६ बाद ४२७ धावा केल्या होत्या. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात ४०७ धावांवर ऑलआऊट केल्याने १८० धावांची आघाडी मिळाली होती. यासह टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने चौथ्या दिवशीच ३ मोठ्या विकेट गमावल्या आहेत. यासह संघाने ३ विकेट्स गमावत ७२ धावा केल्या आहेत. भारताकडे अजूनही ५३६ धावांची आघाडी आहे आणि विजयासाठी ७ विकेट्सची गरज आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने १ तर आकाशदीपने २ विकेट्स घेतले आहेत.