scorecardresearch

IND vs ENG 5th Test : एजबस्टनची खेळपट्टी जाफरच्या रडारवर; भन्नाट मीम शेअर करत उडवली खिल्ली

Wasim Jaffer Edgbaston Pitch Meme : मायकल वॉनसोबत ट्वीटर युद्ध खेळता-खेळता आता त्याने आपला मोर्चा एजबस्टनच्या खेळपट्टीकडे वळवला आहे.

Wasim Jaffer Edgbaston Pitch Meme
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर आजकाल आपल्या सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे जास्त चर्चेत असतो. प्रतिस्पर्धी देशांतील खेळाडूंना टोमणे मारने असो किंवा भारतीय खेळाडूंना खास आपल्या गुढ शैलीमध्ये सल्ले देणे असो दोन्हीही गोष्टी तो अगदी चोखपणे पार पाडतो. ट्विटरवरती तो विशेष सक्रिय असतो. भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या एजबस्ट कसोटी सामन्यादरम्यात तर जाफरने ट्वीटरवर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे. मायकल वॉनसोबत ट्वीटर युद्ध खेळता-खेळता आता त्याने आपला मोर्चा एजबस्टनच्या खेळपट्टीकडे वळवला आहे. त्यासंबंधित जाफरने एक भन्नाट मीम शेअर केले आहे.

चौथ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली तेव्हा खेळपट्टीमध्ये काहिसे बदल झाल्याचे जाफरचे म्हणणे आहे. त्याने एक मीम शेअर करून अप्रत्यक्षपणे पीच क्युरेटरवर टीका केली आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावाच्या सुरुवातीस लख्ख सूर्यप्रकाश होता. ज्यामुळे चेंडूचा स्विंग कमी होऊन खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक आदर्श दिसत होती. हे बघितल्यानंतर जाफरने ‘खट्टा मीठा’ या हिंदी चित्रपटातील एक फोटो ट्वीटरव पोस्ट केला. ज्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि जॉनी लीव्हर हे रस्ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड रोलरमध्ये बसलेले दिसत आहेत. खेळपट्टी सपाट करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानातही रोलरचा वापर केला जातो, ज्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते.

आपल्या खेळाडूंना मदत करण्यासाठी डावाच्या विश्रांतीदरम्यान जाणीवरपूर्वक खेळपट्टीवर जड रोलरचा फिरवले गेली, अशी अप्रत्यक्ष टीका जाफरने एजबस्टन पीच क्युरेटरवर केली आहे. जाफरचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचा – IND vs ENG T20 :… अन् भारतीय संघातील खेळाडूंनी लावला ‘दूल्हे का सेहरा सुहाना’चा सूर

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि वसिम जाफरचीही ट्वीटरवर जोरदार जुगलबंदी सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर जोरदार कुरघोडी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng 5th test wasim jaffer share a hilarious meme to describe edgbaston pitch vkk

ताज्या बातम्या