Ben Duckett Zak Crawley Partnership in Headingley Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडची सलामी जोडी जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी विक्रम आपल्या नावे केला आहे. चौथ्या डावात भारताने दिलेल्या ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी १८८ धावांची मोठी भागीदारी रचली. प्रथम त्यांनी १०० धावांची भागीदारी केली आणि नंतर सुमारे ७६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळवला जातोाय. या सामन्यापूर्वी, या मैदानावर कसोटीच्या चौथ्या डावात फक्त तीन वेळा सलामी जोडीने १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. पण या सामन्यात जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी केवळ १०० धावांची भागीदारी केली नाही तर एक मोठा विक्रमही रचला आहे.

१९४९ मध्ये, न्यूझीलंडच्या व्हर्डन स्कॉट आणि बर्ट सटक्लिफ यांनी सामन्याच्या चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. तेव्हापासून कोणीही हा त्यांचा विक्रम मोडू शकले नाहीत. १९८२ मध्ये, वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांनी याच मैदानावर चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली होती. यापूर्वी १९८२ मध्ये इंग्लंडच्या ग्रॅमी फाउलर आणि ख्रिस टैवरे यांनी चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर चौथ्या डावात पहिल्या विकेटसाठी १०० धावा केल्या आहेत.

इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी केवळ १०० धावांची भागीदारी केली नाही तर सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही केला. बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी केली. ही या मैदानावरील सर्वाेच्च भागीदारी आहे. यापैकी कोणत्याही संघाच्या खेळाडूने इतकी मोठी भागीदारी केली नव्हती. या दोघांनी मोठी भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडने भारताला विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य दिले. या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी वादळी सुरूवात करून दिली. ज्यामध्ये बेन डकेटने १७० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकारासह १४९ धावा केल्या आहेत. तर जॅक क्रॉलीने १२६ चेंडूत ७ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली.