Jonny Bairstow Century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटी सामना एजबस्टन येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून इंग्लंड पहिल्या डावात अद्याप पिछाडीवर आहे. दरम्यान, सुरुवातीचे सर्व फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकट्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने एजबस्टन येथे धडाकेबाज शतक ठोकले आहे. त्याने ११९ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील सलग तिसरे शतक ठरले आहे.

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याने ट्रेंट ब्रिज आणि हेडिंग्ले येथे एकापाठोपाठ एक शतक झळकावले होते. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही त्याने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला आहे. इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर माना टाकलेल्या असताना जॉनीने एक बाजू लावून धरली.

भारताविरुद्ध शतक करून त्याने या वर्षातील आपले पाचवे कसोटी शतक साजरे केले. आजच्या शतकी खेळीमध्ये १४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. यासोबतच तो यावर्षात (२०२२) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणार फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – VIDEO : विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोचे मैदानात जुंपले भांडण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेडिंग्ले येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तर जॉनी बेअरस्टोने ४४ चेंडूत ७१ धावांची वादळी खेळी केली होती. त्याने अवघ्या ३० चेंडूत कसोटी अर्धशतक पूर्ण केले होते. इंग्लिश कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले होते.