scorecardresearch

Premium

IND vs ENG Test Series: इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने लावली विक्रमांची रांग; भारतासाठी ठरला खलनायक

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे.

Jonny Bairstow
फोटो सौजन्य – ट्वीटर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. एजबस्टन येथे झालेल्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला. भारताने इंग्लंडला विजयासाठी एकूण ३७८ धावांचे लक्ष्य दिले होते. हे इंग्लंडला शेवटच्या डावात आतापर्यंत मिळालेले सर्वात मोठे लक्ष्य होते. त्यामुळे इंग्लंडचा विजयी प्रवास खडतर मानला जात होता. मात्र, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने २५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून भारताला मालिका विजयापासून रोखले. जॉनी बेअरस्टो तर या सामन्यामध्ये भारतासाठी खलनायकच ठरला.

इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोने एजबस्टन कसोटीच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात शतक (११४) झळकावून इतिहास रचला. या कसोटीतील बेअरस्टोचे हे दुसरे शतक होते. पहिल्या डावातही त्याने बॅटने १०६ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. दुसऱ्या डावात ठोकलेले शतक हे बेअरस्टोच्या कसोटी कारकिर्दीतील १२वे आणि २०२२ मधील सहावे शतक ठरले. एवढेच नाही तर गेल्या तीन कसोटी सामन्यांतील शेवटच्या पाच डावांमधील हे त्याचे चौथे शतक आहे.

Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम
Who is Sameer Khan who stunned Marcus Stoinis and Steve Smith
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन दिग्गजांना नेट प्रॅक्टिसमध्ये आपल्या गोलंदाजीने चकीत करणारा, कोण आहे समीर खान?
Virat Kohli And Rohit Sharma New Record
IND vs SL: विराट-रोहितने रचला इतिहास, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली जोडी

हेही वाचा – IND vs ENG Test Series : बेअरस्टो आणि रूटने हिसकावून नेला भारताचा विजय; मालिका सुटली बरोबरीत

यापूर्वी, त्याने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धडाकेबाज शतकी खेळी केल्या होत्या. किवी संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतके झळकावले होती. याशिवाय, एजबस्टन कसोटीतील चौथ्या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार डावांचा टप्पा ओलांडला होता. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंड ११वा खेळाडू ठरला आहे.

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने आठ कसोटी सामन्यांतील १६ डावांमध्ये ९८० धावा फटकावल्या आहेत. ज्यात सहा शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng jonny bairstow created several records by scoring 6th test hundred in 2022 vkk

First published on: 05-07-2022 at 17:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×