Nasser Hussain slams England team and his Bazball : धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेती शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर ४-१ च्या फरकाने आपल्या नावे केली. आता या मालिकेत इंग्लंडचा पराभव झाल्याने माजी कर्णधार नासेर हुसैनने निराशा व्यक्त केली. त्याचबरोबर इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर संताप व्यक्त केला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैनने भारताविरुद्धच्या मालिकेतील ४-१ अशा पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना वैयक्तिक कामगिरीवर काम करण्याचा आणि ‘बॅसझबॉल’चे वेड सोडून देण्याचा सल्ला दिला. कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकपणे खेळण्यासाठी इंग्लंडने ‘बॅसबॉल’ शैलीचा अवलंब केला, पण ही रणनीती भारताविरुद्ध त्यांच्या अंगलटी आल्याचे दिसले.

‘बॅझबॉल’ शब्दामुळे आम्ही गोंधळलो –

नासिर हुसैनने स्काय स्पोर्ट्समधील आपल्या कॉलममध्ये लिहिले की, ‘बॅझबॉल’ या शब्दामुळे आम्ही गोंधळलो. टीम आणि टीम मॅनेजमेंटला ‘बॅझबॉल’ हा शब्द फायदेशी ठरलेला नाही. त्यामुळे वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

हेही वाचा – ‘BCCI’ने कसोटी क्रिकेटसाठी जाहीर केलेल्या योजनेवर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला…

प्रतिस्पर्धी संघाकडे बघा – नासिर हुसैन

हुसैन म्हणाला, ”प्रतिस्पर्धी संघाकडे बघा. जीवनाच्या प्रत्येक पैलूप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न केले आणि शिकले. मग आम्ही का कमी पडलो? झॅक क्रॉऊलीला चांगली सुरुवात मिळून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेंडू अगदी नवीन असताना बेन डकेटने आक्रमक पद्धतीचा अवलंब केला. तसेच संपूर्ण मालिकेत बेन स्टोक्सची बॅट चालली नाही. कारण तो निव्वळ फलंदाज म्हणून खेळत होता हेही असू शकते. त्यामुळे आता फक्त तुमच्या स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करा आणि त्यात सुधारणा करा.”

हेही वाचा – IND vs ENG : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची असते –

हुसैनने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ५०० ​​हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे कौतुक केले. नासिर हुसेन म्हणाला, “बॅझबॉलबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले आहे. या परिस्थितीत वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची असते, असे मी यापूर्वीही म्हटले होते. या सामन्यात जिमी अँडरसन आणि रवींद्रचंद्रन अश्विन हे दोन खेळाडू खेळत होते. ते या खेळाचे महान खेळाडू बनले, कारण त्यांनी सतत आपला खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले.”