१५ वर्षानंतर टी-२० विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न इंग्लंडमुळे धुळीस मिळालं आहे. इंग्लंडच्या संघाने आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा तब्बल १० गडी राखून पराभव केला. टी-२० सामन्यांमधील भारताच्या सर्वात लजिरवाण्या पराभवांपैकी एक ठरलेल्या या सामन्यामध्ये आधी भारतीय फलंदाजांनी कच खाल्ली नंतर भारतीय गोलंदाजांनी त्याहून वाईट कामगिरी करत सामना गमवाला. भारताची गोलंदाजी इतकी सुमार झाली की इंग्लंडच्या संघातील एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाज बाद करु शकले नाहीत. भारताच्या या पराभवानंतर आधीच अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेल्या पाकिस्तानी चाहत्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं जात आहे. असं असतानाही पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की पाहा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

इंग्लंडने बिनबाद १७० धावा करत लक्ष्य गाठल्यानंतर काही मिनिटांमध्ये आफ्रिदीने ट्वीटरवरुन या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवताना इंग्लंड, पाकिस्तान आणि भारतीय संघाचा उल्लेख केला आहे. इंग्लंडचं अभिनंदन करतानाच त्याने आगामी अंतिम सामन्याबद्दलही आपल्या ट्वीटमध्ये भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

“इंग्लंडच्या संघाने काय उत्तम कामगिरी केली आहे. हा उपांत्य फेरीचा सामना म्हणजे काही आव्हान नसणारा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजीसाठी भारताकडे कोणतंही उत्तर नव्हतं. अॅलेक्स हेल्स आणि जॉस बटलरने भन्नाट फलंदाजी केली,” असं आफ्रिदीने म्हटलं आहे. याच ट्वीटमध्ये त्याने, “आता लक्ष मेलबर्न क्रिकेट मैदानावरील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे आहे,” असंही आफ्रिदी म्हणाला आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे.