I don’t play for India we can go back to selling track pants on local trains : राजकोट येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी महान क्रिकेटपटू अनिल कुंबळेने सर्फराझ खानला पदार्पणाची कसोटी कॅप दिली, तेव्हा त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याच्या शेजारी त्याची पत्नी होती, जी देखील भावनिक झाली होती. मग तो धावत त्याचे वडील नौशाद, त्याच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीकडे गेला आणि त्याला मिठी मारली. अशा प्रकारे कसोटी पदार्पण झाल्यानंतर मालिकेत त्यांने शानदार कामगिरी केली. सर्फराझ खान एकदा इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला होता, “जेव्हा मी माझ्या देशासाठी खेळेल, तेव्हा दिवसभर रडेल.”

मालिकेतील तिसऱ्या कसोटी सर्फराझने पदार्पणाच्या सामन्यात ६६ चेंडूत ६२ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि तो धावबाद झाला होता. मात्र, भारताला पाच विकेट्सवर ३२६ धावांपर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. सर्फराझने त्याच्या संपूर्ण डावात धैर्य, संयम आणि इच्छाशक्ती दाखवली. यावरून तो कसोटी स्तराचा खेळाडू असल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याची कसोटी पाहिली. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे होते. सर्फराझनेने भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यामध्ये त्यांच्या वडिलांचे योगदान मोठे आहे, जे आझमगडहून मुंबईत आले आणि अनेक अडचणींचा सामना केला. नौशाद आपल्या मुलाचे पदार्पण पाहण्यासाठी सौराष्ट्रात येणार नव्हते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या समजवल्यानंतर ते सामना पाहण्यासाठी आले.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

१५ वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले –

सर्फराझचा प्रवास ही उत्कटता आणि चिकाटीची एक उत्तम यशोगाथा आहे. सुमारे १५ वर्षांपासून, तो दररोज पाच वाजता उठत असे, जेणेकरून तो सकाळी ६.३० वाजता सरावासाठी क्रॉस मैदानावर पोहोचू शकला. धुळीने माखलेल्या खेळपट्ट्यांवर तो आपल्या फलंदाजीच्या कौशल्याचा विकास करण्यात तासनतास घालवायचा. तो जेव्हा सरावाला जात नसायचा, तेव्हा भाऊ मुशीरसह खास क्रिकेट खेळपट्टीवर सराव करायचा. जे नौशाद यांनी त्यांच्या घराबाहेरच तयार केले होते. नौशाद थ्रो-डाउन करण्यात तासनतास घालवायचे. मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी विरोधी संघांना पैसे द्यायचे. यामध्ये संघ जिंकला किंवा हरला तरी सर्फराझ संपूर्ण डाव खेळायचा.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : हनुमा विहारीच्या प्रकरणाला नवं वळण, आंध्र क्रिकेट असोसिएशनने घेतला चौकशीचा निर्णय

नौशाद आणि त्यांचाय मुलांच्या आयुष्याचा प्रवास –

नौशाद आणि त्यांच्या मुलांसाठी आयुष्याचा प्रवास सोपा नव्हता. उत्तर प्रदेशातील आझमगडमधून स्थलांतरित झाल्यानंतर नौशाद ट्रेनमध्ये टॉफी आणि काकडी विकत असे. ट्रॅक पँट विकण्यासाठी देखील जायचे. ते पश्चिम रेल्वेत चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते. कमाई खूप कमी होती. म्हणूनच ते हे काम करायचे. एकदा ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले होते की, “आम्ही झोपडपट्टीत राहायचो. शौचालयासाठी रांगेत उभे राहावे लागायचे, जिथे लोक माझ्या मुलांना चापट मारुन पुढे निघून जायचे. आम्ही काहीही घेऊन आलो नाही आणि काहीही घेऊनही जाणार नाही. सर्फराझ एके दिवशी मला म्हणाला होता, ‘अब्बू, जरी मी भारतासाठी खेळलो नाही, तरी आपण लोकल ट्रेनमध्ये ट्रॅक-पँट विकायला परत जाऊ शकतो.’ आता नौशाद यांना मुलांच्या पदार्पणानंतर हा भावनिक प्रसंग आठवला.

हेही वाचा – Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

उत्कृष्ट कामगिरीनंतरही प्रतीक्षा करावी लागली –

दलेर मेहंदी आणि प्रीतम यांनी गायलेले दंगल चित्रपटाचे टायटल ट्रॅक ऐकून सर्फराझची दिवसाची सुरुवाच व्हायची. सर्फराझला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची भारताच्या संघात निवड झाली होती, परंतु वरिष्ठ खेळाडू परतल्यावर त्याला वगळण्यात आले. त्याला वेग आणि उसळीचा सामना करण्यास सोयीस्कर वाटत नसल्याची चर्चा पसरली. तसेच आयपीएलचा हंगामा खराब गेल्यामुळे अडचणी आणखी वाढल्या होत्या.