India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक २०२३ च्या ४५व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच, त्याने विश्वचषकात कर्णधार म्हणून देखील सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या ए.बी. डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे.

हिटमॅन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रोहित शर्माने २०२३ या एक वर्षात सर्वाधिक षटकार मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने आतापर्यंत ५९* षटकार मारले आहेत. ए.बी. डिव्हिलियर्सने एकूण ५८ षटकार मारले होते. त्याने २०१५ साली एका वर्षात ५८ षटकार ठोकत मोठा विक्रम केला होता. त्याच्या खालोखाल ‘द युनिव्हर्सल बॉस’अशी ओळख असणारा ख्रिस गेलचे नाव आहे. त्याने २०१९मध्ये ५६ षटकार मारले आहेत. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बूम-बूम शाहिद आफ्रिदी असून त्याने २०१६ मध्ये ४८ षटकार मारले आहेत.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

रोहित शर्माने ५९वा षटकार मारत आणखी एक विक्रम केला आहे. आतापर्यंतच्या विश्वचषकात मिळून त्याने इंग्लंडच्या इयन मोर्गनचा २२ षटकारांचा विक्रम मोडला. रोहितने एक कर्णधार म्हणून सर्वाधिक आतापर्यंत २३* षटकार मारले आहेत. त्याखालोखाल ए.बी. डिव्हिलियर्स २१, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरॉन फिंच १८ आणि न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम१७ षटकार मारले आहेत.

भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर १५ आणि १६ नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सामना सराव म्हणून १५ तारखेला मैदानात उतरेल. त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तो सध्या शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत संघ भारताला काही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताची पहिली विकेट १०० धावांवर पडली. शुबमन गिल ३२ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. एका मीकेरेनने त्याला निदामनुरुकडे झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. आता विराट कोहली रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे. १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या १०४/१ आहे.

हेही वाचा: Pakistan Team: इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर माजी पीसीबी प्रमुख रमीझ राजा भडकले; म्हणाले, “बाबर-हारिस आता…”

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय षटकार

५९* – रोहित शर्मा २०२३*

५८ – एबी डिव्हिलियर्स २०१५ मध्ये

५६ – ख्रिस गेल २०१९ मध्ये

४८ – शाहिद आफ्रिदी २०१६ मध्ये

एकाच विश्वचषकात कर्णधाराचे सर्वाधिक षटकार

२३* – २०२३ मध्ये रोहित शर्मा*

२२ – इऑन मॉर्गन २०१९ मध्ये

२१ – एबी डिव्हिलियर्स २०१५ मध्ये

१८ – अॅरॉन फिंच २०१९ मध्ये

१७ – बी मॅक्युलम २०१५ मध्ये