India vs Nederland, ICC World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३चा शेवटचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाला १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा आहे, त्याआधी मोहम्मद सिराजच्या दुखापतीमुळे टीम इंडिया आणि रोहित शर्माच्या चिंतेत भर पडली आहे. वास्तविक, झेल घेताना सिराज जखमी झाला आणि मैदानाबाहेर गेला.

नेदरलँड्सच्या डावातील १५व्या षटकात कुलदीप यादवच्या चेंडूवर मोहम्मद सिराज झेल घेताना चुकला. तो चेंडू सिराजच्या थेट गळ्याला लागला आणि सिराज जायबंदी झाला. चेंडू खूप उंच गेला होता आणि झेल घेताना सिराजने आपले दोन्ही हात गळयासमोर अगदी जवळ ठेवले होते. सिराजच्या हातातून चेंडू निसटून तो थेट त्याच्या घशावर आदळला. त्यानंतर सिराजला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि भारतीय गोलंदाजाला दुखत असल्याचे दिसून येताच फिजिओ यांनी त्याला मैदानाबाहेर नेले.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

या घटनेनंतर सिराज मैदानातून बाहेर पडला. जेव्हा सिराजने कुलदीपच्या चेंडूवर डच फलंदाज मॅक्स औदौडचा झेल सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे. झेल घेत असताना सिराजच्या गळ्यावर चेंडू कसा आदळला, हेही व्हिडीओत स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आले आहे.

भारताने उभारला ४१० धावांचा डोंगर

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४ गडी गमावून ४१० धावांचा डोंगर उभारला आहे. श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद १२८ धावा केल्या. त्याला लोकेश राहुलने १०२ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. कर्णधार रोहितने ६१ धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली करून दिली. शुबमन गिल आणि विराट कोहलीने प्रत्येकी ५१ धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.

हेही वाचा: IND vs NED: राहुलने झळकावले विश्वचषकातील भारताकडून सर्वात जलद शतक, श्रेयसने केली सचिन-युवराजची बरोबरी

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी २०८ धावांची भक्कम भागीदारी केली. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने २००७ मध्ये बर्म्युडाविरुद्ध ४१३ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ते देशासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले. नेदरलँड्सकडून जस्ट-डी-लीडेने दोन विकेट्स घेतल्या. मीकरेन आणि मर्व्ह यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युतरात नेदरलँड्सने आतपर्यंत पाच गडी गमावून १६८ धावा केल्या आहेत.