India vs Nederland, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध षटकार मारला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ४ गडी गमावून ४१० धावा केल्या. श्रेयस अय्यरने ९४ चेंडूत १० चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याचवेळी के.एल. राहुलने ६४ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. राहुल आणि श्रेयसनेही अनेक विक्रम केले. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ६१ धावा, शुबमन गिलने ५१ धावा आणि विराट कोहलीने ५१ धावा केल्या.

राहुलने रोहितचा विक्रम मोडला

राहुलने ६२ चेंडूत शतक झळकावले, जे भारताकडून विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक आहे. या प्रकरणात राहुलने रोहितचा विक्रम मोडला. रोहितने या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत शतक झळकावले होते. राहुलने श्रेयस अय्यरबरोबर चौथ्या विकेटसाठी १२८ चेंडूत २०८ धावांची भागीदारी केली.

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
GT vs DC : दिल्लीचा IPL मधील सर्वात मोठा विजय, घरच्या मैदानावर गुजरातचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO
Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”

विश्वचषकात भारताकडून सर्वात जलद शतक करणारे खेळाडू

६२ चेंडू- के.एल. राहुल विरुद्ध नेदरलँड्स, २०२३

६३ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, २०२३

८१ चेंडू – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बर्म्युडा, २००७

८३ चेंडू – विराट कोहली विरुद्ध बांगलादेश, २०११

राहुलचे शतक हे या विश्वचषकातील पाचवे जलद शतक आहे. या विश्वचषकात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. त्याने नेदरलँड्सविरुद्ध ४० चेंडूत शतक झळकावले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम ४९ चेंडूत शतकासह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने ५९ चेंडूत शतक झळकावले. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ६१ चेंडूत शतक झळकावले.

हेही वाचा: IND vs NED: श्रेयस-राहुलची बंगळुरूमध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी, शानदार शतके झळकावत टीम इंडियाच्या चाहत्यांना दिली दिवाळी भेट

१२ वर्षांनंतर विश्वचषकात टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावरील खेळाडूने केले शतक

आज श्रेयस अय्यरने आणखी विक्रम केला. विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा श्रेयस अय्यर भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. १२ वर्षांनंतर भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका फलंदाजाने शतक झळकावले आहे. युवराज सिंगने शेवटच्या वेळी २०११च्या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ११३ धावांची खेळी केली होती. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने त्याच्या आधी ही कामगिरी केली होती. सचिनने १९९९च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केनियाविरुद्ध १४० धावांची नाबाद खेळी खेळली होती.