scorecardresearch

IND vs NZ T20: ‘ऐकाव ते नवलच’ एकाच दिवशी भारत-न्यूझीलंड असे दोन T20 सामने, आश्चर्यकारक वेळापत्रकाने चाहते संभ्रमात

India vs New Zealand: २७ जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकाच दिवसात दोन सामने खेळवले जातील. दोन्ही संघांमधील पहिला सामना दुपारी सुरू होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी खेळवला जाईल.

IND vs NZ T20: India-NZ T20 matches on the same day fans confused by surprising schedule
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारी रोजी JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे खेळवला जाईल. या मालिकेत भारताची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांना या दिवशी आणखी एक भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्याचे सर्व तपशील आम्ही तुम्हाला सांगतो.

एकाच दिवसात २ टी२० सामने खेळवले जातील

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला अंडर १९ टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी धडक मारली आहे. शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सरस धावगतीच्या जोरावर सुपर सिक्स‌ फेरीतून सरस धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरी जागा मिळवली. सुपर सिक्सच्या ब गटातून भारतासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचा प्रवास केला.

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पुरुष संघ २७ जानेवारीला टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहे. दुसरीकडे, २७ जानेवारी रोजी, टी२० विश्वचषक २०२३ चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड अंडर-१९ महिला संघांमध्ये खेळवला जाईल. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते रविवारी पोचेफस्ट्रूममध्येच होणाऱ्या अंतिम फेरीत भिडतील.

टीम इंडिया विजयाचा मोठा दावेदार

सुपर सिक्स फेरीच्या सुरुवातीला भारतीय १९ वर्षाखालील महिला संघ ऑस्ट्रेलियाने केवळ ८७ धावांवर ऑल आऊट झाला होता, परंतु भारतीय अंडर १९ महिला संघाने पुढच्या सामन्यात शानदार पुनरागमन करत श्रीलंकेचा सात विकेट्स राखून पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांचे स्थान.. भारताची उपकर्णधार श्वेता सेहरावतची फलंदाजी खूप महत्त्वाची होती. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पाच डावांत २३१ धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर डावखुरा फिरकीपटू मन्नत कश्यप आणि लेगस्पिनर पार्श्वी चोप्रा यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.

हेही वाचा: IND vs AUS: जसप्रीत बुमराह थेट IPLमध्येच खेळणार? संपूर्ण भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला मुकणार

या वेळेपासून हे दोन्ही सामने खेळवले जाणार आहेत

भारत महिला अंडर-१९ विरुद्ध न्यूझीलंड महिला अंडर-१९ टी२० विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याचवेळी, भारत विरुद्ध न्यूझीलंड या पुरुष संघांमधील टी२० मालिकेतील पहिला सामना JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे होणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 17:00 IST