scorecardresearch

IND vs AUS: जसप्रीत बुमराह थेट IPLमध्येच खेळणार? संपूर्ण भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला मुकणार

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार? कर्णधार रोहित शर्माकडेही या प्रश्नाचे योग्य उत्तर नाही, मात्र त्याच्या पुनरागमनाबद्दल एक वाईट बातमी येत आहे.

IND vs AUS: Jasprit Bumrah to play straight in IPL? Will miss the entire India-Australia Test series
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Jasprit Bumrah IND vs AUS: जसप्रीत बुमराहने सप्टेंबर २०२२ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. गेल्या दीड वर्षात बुमराह दुखापतींमुळे सतत त्रस्त आहे. दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक २०२२, ICC टी२० विश्वचषक २०२२ सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकला नाही. बुमराह पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेत पुनरागमन करेल, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहची भारतीय संघात निवड झाली नव्हती आणि आता शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्येही तो खेळू शकणार नसल्याच्या बातम्या येत आहेत.

बुमराह इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ पूर्वी पुनरागमन करू शकणार नाही, असे मानले जात आहे. पण कदाचित आयपीएलमध्ये तो खेळू शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सवर सांगितले की, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराह १०० टक्के फिट असणे कठीण आहे. पण एक मात्र नक्की की मालिका काहीही असो, दुखापतीतून परतण्याची घाई आम्ही करणार नाही. पाठीच्या दुखापतीतून सावरायला वेळ लागतो. टीम इंडियात पुनरागमन होण्यास बराच वेळ घेतला तरी चालेल.”

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “आतापर्यंत तो निवडीसाठी अनफिट आहे आणि त्याच्या पुनरागमनासाठी किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. यास आता एक महिना किंवा अधिक वेळ लागू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहची निवड झाली नव्हती. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती, परंतु पाठीत दुखू लागल्याची तक्रार करत त्याने नाव मागे घेतले.”

हेही वाचा: आधी गर्लफ्रेंडकडून खाल्ले फटके अन् आता चप्पल-बूट कंपनीने…, ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कला लागला कोट्यावधींचा चुना

जेव्हा कर्णधार रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहच्या दुखापतीबद्दल अपडेट विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला अद्याप याबद्दल खात्री नाही. मला अपेक्षा आहे की तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन कसोटी सामने खेळेल. त्याच्या दुखापतीमुळे आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, पाठीच्या दुखापती नेहमीच गंभीर असतात. आम्हाला सतत भरपूर क्रिकेट खेळावे लागते, आम्ही एनसीएमधील त्याच्या डॉक्टर आणि फिजिओच्या सतत संपर्कात असतो. वैद्यकीय पथक त्याला आवश्यक तेवढा वेळ देईल.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:16 IST
ताज्या बातम्या