इंदूरमधील होळकर स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माने ८५ चेंडूंचा सामना करताना १०१ धावा केल्या. दरम्यान रोहित शर्माचे शतक झळकावताच सूर्यकुमार यादवने आनंदाच्या भरात अशी काही प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माच्या शतकावर भारतीय डगआऊटमधील सर्व खेळाडूंनी उभे राहून रोहितच्या शानदार खेळीसाठी टाळ्या वाजवल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या एका हावभावाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. सूर्यकुमार यादवने चेहऱ्यावर स्मितहास्य दाखवत टाळ्या वाजवल्या आणि नंतर बोटे हलवून काहीतरी इशारा केला. सूर्यकुमारला पाहून क्षणभर असे वाटले की तो षटकार लगावण्याचा इशारा देत आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

सूर्यकुमार यादवच्या या हावभावाचा अर्थ काय होता, हे रोहित शर्मा किंवा स्काय दोघेच सांगू शकतील. पण, तरीही हा एक अनोखा क्षण होता ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरला झाला. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: विराट-इशान एकाच दिशेने धावल्याने गोंधळ; मग किशनने केले असे काही की, VIDEO होतोय व्हायरल

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, रोहित आणि शुबमनने पहिल्या गड्यासाठी २१२ धावांचे भक्कम भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ८५ चेंडूत १०१ धावा काढून बाद झाला. त्याचबरोबर शुबमनदेखील ७८ चेंडूत ११२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याने ५४ धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर फलंदाज खास कामगिरी करताना आली नाही.