scorecardresearch

IND vs NZ 1st T20: ‘विचार केला नव्हता की…’, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिली प्रतिक्रिया

Hardik Pandya on Washington Sundar:न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-२० सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपण कुठे कमी पडलो, याचा खुलासा केला. त्याचबरोबर त्याने वाशिंग्टन सुंदरच्या कामगिरीचे कौतुक देखील केले.

IND vs NZ 1st T20 Updates
हार्दिक पांड्या (फोटो-ट्विटर)

शुक्रवारी रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. किवी संघाने २० षटकात १७६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला निर्धारित २० षटकात ९ बाद १५५ धावाच करता आल्या. अशा प्रकारे भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्याने पराभवाची कारणे सांगण्याचा प्रयत्न केला.

विकेट अशी असेल असा विचारही कुणी केला नव्हता –

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ‘विकेट अशी असेल असा विचारही कुणी केला नव्हता आणि दोन्ही संघ आश्चर्यचकित झाले. पण त्यावर ते अधिक चांगले क्रिकेट खेळले आणि त्यामुळे निकाल लागला. किंबहुना, नवीन चेंडू जुन्यापेक्षा जास्त टर्न घेत होता. ज्या पद्धतीने तो फिरत होता, ज्या पद्धतीने तो उसळला होता, त्याने आम्हाला आश्चर्यचकित केले. मला वाटत नाही की ही विकेट १७७ धावांची होती. आम्ही खराब गोलंदाजी केली आणि २०-२५ धावा जास्त दिल्या. हा एक तरुण गट आहे आणि आम्ही त्यातून शिकू.”

भारत हा सामना हरला असेल पण वॉशिंग्टन सुंदरने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. सुंदरने पहिल्या गोलंदाजीत ४ षटकात केवळ २२ धावा देऊन पहिल्या दोन विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने फलंदाजीतही अप्रतिम खेळ करत अर्धशतक झळकावले. सुंदरच्या अष्टपैलू कामगिरीचे कौतुक करताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ”आजचा सामना वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध न्यूझीलंड असा होता.”

वॉशिंग्टन सुंदरची स्तुती केली –

हेही वाचा – Shoaib Malik Tweet: सानिया मिर्झाच्या निवृत्तीनंतर पती शोएब मलिकची भावनिक पोस्ट; म्हणाला, “तू कारकिर्दीत…!”

कर्णधार पुढे म्हणाला, ”त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण केले, त्यामुळे आज वॉशिंग्टन विरुद्ध न्यूझीलंड सामना असल्यासारखे वाटले. आम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे जी फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकेल. कारण ते आम्हाला खूप आत्मविश्वास देईल. तसेच ते आम्हाला पुढे जाण्यास मदत करेल.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 11:38 IST
ताज्या बातम्या