भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताला न्यूझीलंडकडून सात विकेट्सने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे यजमान संघाने मालिकेत १-० अशा फरकाने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस म्हणाला की आम्ही चांगली धावसंख्या केली होती, पण काही गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नाहीत. मात्र, या सामन्यातून खूप काही शिकून आपण पुढे जाऊ शकतो. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ३०६/७ धावा केल्या, प्रत्युत्तरात किवींनी ४८व्या षटकात ३०९/३ धावा केल्या. टॉम लॅथमला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सामन्यानंतर भारतीय संघाच्या पराभवावर बोलताना श्रेयस म्हणाला, ”आम्ही ज्या परिस्थितीत होतो, त्या परिस्थितीत ३०७ धावसंख्या उभारणे ही खूप चांगली धावसंख्या होती. निश्चितपणे काही गोष्टी आमच्यासाठी योग्य झाल्या नाहीत, पण आम्ही त्यातून शिकू शकतो. आम्ही या पराभवाचे विश्लेषण करू आणि नवीन कल्पना घेऊन पुढील सामन्यात उतरू. थेट भारतातून येऊन इथे खेळणे तितके सोपे नाही. विकेट (खेळपट्टी) बदल सर्वत्र होत राहतात.”

हेही वाचा – IND vs NZ: मायकल वॉनने धवन-लक्ष्मणच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘टीम इंडिया जुन्या….!’

अय्यर पुढे म्हणाला, ”हे असे आव्हान आहे ज्याचा तुम्हाला सामना करायचा आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे आणि परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त खेळी खेळली. कोणत्या गोलंदाजाला कोणत्या वेळी लक्ष्य करायचे हे त्यांना माहीत होते. माझ्या मते त्यांच्या भागीदारीमुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz shreyas iyer has given a big reaction after the first loss against new zealand vbm
First published on: 26-11-2022 at 15:42 IST