भारत आणि न्यूझीलंड संघांत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रोमांचक सामना जिंकला. या अतितटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला १२ धावांनी पराभवाची धूळ चारली. यानंतर बीसीसीआयने शुबमन गिल, रोहित शर्मा आणि इशान किशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा शुबमन गिल आणि इशान किशनसोबत दिसत आहे. सध्याच्या संघात या तीन फलंदाजांच्या नावावर द्विशतक ठोकण्याचा विक्रम आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा शुबमन गिलला त्याच्या खेळीबद्दल विचारताना दिसत आहे, तर इशान किशन त्याच्या प्री-मॅच रूटीनबद्दल विचारत आहे. किशनच्या या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला की, त्याला सामन्यापूर्वी या डावखुऱ्या फलंदाजाला शिवीगाळ करावी लागते.

जेव्हा इशान किशनने शुबमन गिलला त्याच्या प्री-मॅच रूटीनबद्दल विचारले, तेव्हा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की तुम्ही लोक एकत्र झोपता, हा प्री-मॅच रूटीन आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना शुबमन गिल म्हणाला, ”माझे प्री-मॅच रूटीन हा (इशान) माणूस खराब करतो. कारण ते मला झोपू देत नाही. त्याला आयपॅडवर इअरपॉड लावायचे नसतात… मूव्ही फुल व्हॉल्यूमवर चालू असतो… आणि मी त्याला शिवी देऊन सांगतो आवाज कमी कर किंवा इअरपॉड लाव… मग तो म्हणते की तू माझ्या खोलीत झोपत आहेस. त्यामुळे माझी मर्जी चालेल…. हेच माझे प्री मॅच रूटीन आहे आणि आमची रोज भांडण होतात.”

या दरम्यान रोहित आणि इशानने शुबमन गिलचे २०० क्लबमध्ये स्वागत केले –

कर्णधार रोहित शर्मा आणि डावखुरा फलंदाज इशान किशनने द्विशतक झळकावणाऱ्या शुबमन गिलचे २०० क्लबमध्ये स्वागत केले. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी, रोहित शर्मा गंमतीने किशनला विचारताना दिसत आहे की, २०० धावा करूनही तू तीन सामने खेळले नाहीत, ज्यावर किशनने उत्तर दिले की तुम्ही कर्णधार आहात, भाऊ. हे उत्तर ऐकून तिन्ही खेळाडू हसायला लागले. किशन म्हणाला, ‘पण ते ठीक आहे, प्रत्येक गोष्टीतून धडा मिळतो.’

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: द्विशतकानंतर शुबमनने दिली महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्या’ षटकात बदलला माझा इरादा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ३३७ धावांवर गारद झाला. ब्रेसवेलने पाहुण्यांसाठी १४० धावांची धडाकेबाज खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी १२ धावांनी पराभव पत्कारावा लागला.