IND vs PAK Handshake Controversy: नुकत्याच झालेल्या आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन केलं नव्हतं. त्यामुळे हस्तांदोलनाच्यामुद्द्यावरून एक मोठा वाद निर्माण झाला. २०२५ च्या महिला विश्वचषकातही भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. पण मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
मलेशियातील जोहोर बारू येथे सुरू असलेल्या सुलतान जोहोर कप ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही तर एकमेकांना हाय फाइव्ह देताना दिसले. पण भारताच्या महिला आणि पुरूष संघाने घेतलेल्या या निर्णयाला हॉकी संघ मात्र पुढे घेऊन जाऊ शकला नाही.
यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत, पहलगामच्या शहीदांचा विश्वासघात करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील युजर्सने म्हटलं की हे खिलाडूवृत्तीचं खरं उदाहरण आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्यावर चर्चा सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना ३-३ असा बरोबरीत राहिला.
भारत-पाकिस्तान हॉकी खेळाडूंचं सामन्यानंतर हाय-फाईव्ह
आशिया चषकात टीम इंडियाने पहिल्याच सामन्यापासून स्पष्ट केलं होतं की ते पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत, ज्यामुळे पाकिस्तानने संतापून बरीच पावलं उचलली, स्पर्धेदरम्यान अनेक वाद पाहायला मिळाले, पण भारताने काही माघार घेतली. परंतु हॉकीच्या मैदानावर हा वाद संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. भारत-पाकिस्तान हाई-फाईव्हचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी मात्र मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. क्रिकेटमध्ये हँडशेक न करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचा चाहत्यांनी म्हटलं आहे.
मलेशियामध्ये सुल्तान ऑफ जोहोर कपचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी एक सामना झाला. हा रोमांचक सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या हाफपर्यंत पाकिस्तानने २-० अशी आघाडी घेतली होती आणि टीम इंडियावर दबाव कायम ठेवला होता.
त्यानंतर भारतीय संघाने पाच मिनिटांत तीन गोल करून स्कोअर ३-२ असा केला. त्यानंतर पाकिस्तानने शेवटच्या पाच मिनिटांत आणखी एक गोल करून स्कोअर ३-३ केला, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला.