IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेड सामना दुबई येथे खेलवला जात आहे. या सामन्यात भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याला २३ धावांवर बाद केलं. यानंतर हार्दिकने त्याच्या हटके स्टाइलमध्ये केलेलं सेलीब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष बाब म्हणजे आऊट होण्याच्या आधीच्याच चेंडूवर बाबरने चौकार लगावला होता, पण त्यानंतच्या दुसर्‍याच चेंडूवर तो बाद झाला.

पाकिस्तानी प्रेक्षकांच्या अपेक्षा खऱ्या ठरवत बाबर आणि इमाम-उल-हक यांनी पाकिस्तानच्या डावाची चांगली सुरूवात केली होती. पण पांड्याने बाबरला दिलेला ‘सेंड ऑफ’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

बाबरने त्याच्या डावाची चांगली सुरूवात केली होती, त्याने पाच चौकार लगावत २६ चेंडूत २३ धावा केल्या होत्या. पण पांड्याच्या ओव्हरमध्ये कव्हर ड्राइव्ह शॉट खेळताना त्याचा बॅटच्या कडेला बॉल लागला आणि चेंडू थेट विकेटकिपर के.एल. राहूलच्या ग्लव्ह्जमध्ये पोहचला. हे पाहाताच भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली.

भारतीय संघामधील सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष करत बाबरची विकेट साजरा केला. पण हार्दिक पांड्यांने आपल्या खास शैलीत बाय-बाय’ करत बाबरला निरोप दिला. पांड्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बाबर मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र पाकिस्तानची धावसंख्या ४१ वर असताना नवव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानची पहिली विकेट पडली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर आधीच दबावाखाली असलेल्या पाकिस्तानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताविरोधात विजयाची खूप आवश्यकता आहे. पण बाबर बाद झाल्यानंतर त्यांची परिस्थिती वाईट झाली. पुढच्याच षटकात, अक्षर पटेलच्या शानदार थ्रोवर इमाम-उल-हक फक्त १० धावांवर धावबाद झाला, ज्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.