Shahid Afridi on Gautam Gambhir: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. २ सप्टेंबरला ग्रुप स्टेजमध्ये दोघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता १० सप्टेंबरला सुपर-४मध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतील. तत्पूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ग्रुप स्टेजमधील भारत-पाक महामुकाबल्यादरम्यान गंभीर म्हणाला होता की, “संघांमधील आपापसातील मैत्री मैदानाबाहेर सोडून आली पाहिजे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतात.”

भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मजामस्ती सुरु होती

पहिल्या डावानंतर सुरू झालेला पाऊस थांबत नसल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, विराट कोहली, बाबर आझम, शादाब खान आणि इतर काही खेळाडू आपापसात विनोद करत होते. २०१२ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र, तरीही खेळाडूंमध्ये अनेकदा आदर दिसून येतो. ते अनेकदा एकमेकांशी हसताना आणि बोलताना दिसतात. यावर टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या विनोदावर खूश दिसत नाही. त्याने कबूल केले की, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैदानावरील अशा प्रकारच्या मैत्रीने तो थोडासा नाराज झाला आहे.

हेही वाचा: World Cup Tickets: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI वर्ल्ड कप २०२३साठी ४लाख तिकिटे करणार जाहीर, ‘या’ दिवशी सुरु होणार बुकिंग

आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यातील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे वाहून गेला. यादरम्यान, स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही तुमच्या राष्ट्रीय संघासाठी मैदानात उतरता तेव्हा तुम्ही मैत्री मैदानाबाहेर सोडून यावी. ते जे सहा-सात तासांच्या क्रिकेटनंतर तुम्ही तुम्हाला हवी तितकी मैत्री बाहेर जपू शकतात.”

गौतम गंभीर पुढे म्हणाला होता की, “आजकाल तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू सामन्यांदरम्यान एकमेकांच्या पाठीवर थाप मारताना दिसतात. तुम्ही काही वर्षांपूर्वी असे कधीही पाहिले नसते. त्या सामन्यादरम्यान त्या-त्या देशांच्या चाहत्यांच्या भावना जोडलेल्या असतात.” गंभीरच्या कमेंटवर पाकिस्तानी मीडियाने शाहिद आफ्रिदीला प्रश्न विचारला असता, त्याने त्याचा जोरदार समाचार घेतला.

हेही वाचा: Gautam Gambhir: “मला क्रिकेटर व्हायचचं नव्हतं…”, गौतम गंभीरने का केलं हे धक्कादायक विधान? जाणून घ्या

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला, “हे त्याचे वैयक्तिक मत आहे. हा त्याचा विचार असून माझे याबाबत वेगळे मत आहे. आम्ही क्रिकेटपटू आणि राजदूतही आहोत, आमचे सर्व जगभरात चाहते आहेत. त्यामुळे जर प्रेमाचा संदेश दिला तर बरे होईल. होय, मैदानावर आक्रमकता आहे, परंतु त्यामध्ये तो एक जीव आहे. शेवटी माणूस महत्त्वाचा असतो.” त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया चषकाच्या सुपर-४ टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामना कोलंबो, श्रीलंकेच्या राजधानीत होणार आहे. गेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. अशा परिस्थितीत हा सामना चांगला होईल, अशी दोन्ही देशांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. या सामन्याआधी पाकिस्तानने सुपर ४ सामन्यातील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावला असेल.