India’s Historic Win in Cape Town : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने सात गडी राखून जिंकला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला होता. या सामन्यातील विजयासह रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीने आफ्रिकेत मालिका अनिर्णीत राखली होती. भारताने ३१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना होता ज्यात भारतीय संघ विजयी ठरला. हा सामना अवघ्या १०७ षटकांत संपला. याचा अर्थ या सामन्यात केवळ ६४२ वैध चेंडू (नो आणि वाईड चेंडू वगळता) टाकण्यात आले. यापूर्वी १९३२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना १०९.२ षटकात संपला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. भारताने ३१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. कारण १९९३ नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने २ जानेवारी १९९३ रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली होती.

Shubman Gill breaks Rohit Sharma record
IND vs ZIM T20I : शुबमन गिलने रोहित शर्माला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
Sanju Samson 110m Six Video viral
Sanju Samson : सॅमसनने ११० मीटरचा षटकार ठोकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Sikandar Raza completes 2000 runs in t20 cricket
IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
India vs Zimbabwe 1st T20I Highlights Cricket Score in Marathi
IND vs ZIM 1st T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेचा १३ धावांनी विजयी, भारतीय ‘यंग ब्रिगेड’ ठरली फ्लॉप
India Women won by 10 wickets against South Africa in Test match
INDW vs SAW Test : शफाली वर्माचं द्विशतक! स्नेह राणाच्या विक्रमी १० विकेट्स, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
best moment of my career says rohit sharma after winning t20 world cup
माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण! ट्वेन्टी२० विश्वविजयानंतर कर्णधार रोहितची भावना
india vs south africa india first team to break 600 run mark in women s tests
महिला संघाचा धावसंख्येचा विक्रम ; भारताचा पहिला डाव ६ बाद ६०३ धावांवर घोषित; दक्षिण आफ्रिकेचीही झुंज
India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ

सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेले कसोटी सामना (चेंडूंनुसार)

६४२ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, २०२४
६५६ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, १९३२
६७२ – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, १९३५
७८८ – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, १८८८
७९२ – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, १८८८ स्पर्धा

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : जसप्रीत बुमराहची दुसऱ्या डावात कमाल! पाच विकेट्स घेत शमी-श्रीसंतला मागे टाकत लावली विक्रमांची रांग

भारताने तिसऱ्यांदा द. आफ्रिकेला १००हून कमी धावसंख्येवर गुंडाळले –

सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. द. आफ्रिका तिसऱ्यांदा भारताविरुद्ध १००हून कमी धावसंख्येवर गारद झाली. हा संघ २०१५ मध्ये नागपुरात ७९ आणि २००६ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ८४ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताविरुद्ध १०० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद होण्याची ही कसोटी इतिहासातील ११वी वेळ होती. भारताने आफ्रिकन संघाचा २३.२ षटकांत पराभव करून कोणत्याही संघाला कमी चेंडूत पराभूत करण्याचा विक्रम मोडीत काढला. याआधी २००६ मध्ये जोहान्सबर्ग येथे आफ्रिकेचा २५.१ षटकांत पराभव झाला होता. द. आफ्रिकेच्या डावात केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : विराट कोहलीच्या ‘या’ कृतीवर संतापला एडन मार्करम, थेट पंचांकडे तक्रार करताना दिसला, पाहा VIDEO

केपटाऊनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी विक्रम –

वर्ष १९९३ – कसोटी सामना अनिर्णित
वर्ष १९९७ – भारत २८२ धावांनी हरला
वर्ष २००७ – भारत ५ विकेटने हरला
वर्ष २०११ – सामना अनिर्णित संपला
वर्ष २०१८ – भारत ७२ धावांनी हरला
वर्ष २०२२ – भारत ७ गडी राखून हरला
वर्ष २०२४ – भारत ७ गडी राखून जिंकला