भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांनी केपटाऊनमध्ये भारतीय संघाच्या झालेल्या पराभवाबद्दल (IND vs SA) प्रतिक्रिया दिली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी आखलेल्या रणनीतीबीबत गावसकरांनी भारतीय संघाला फटकारले आहे. लंचनंतर आफ्रिकेला विजयासाठी ४१ धावांची गरज होती आणि विराटसेनेला ७ विकेट्सची गरज होती. ब्रेकनंतर दक्षिण आफ्रिकेसाठी हे सोपे काम ठरले, त्यांनी धावांचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाला इतिहास रचण्यापासून रोखले.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर गावसकर म्हणाले, ”शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहने लंचनंतरच्या सत्रात गोलंदाजी का केली नाही. हे माझ्यासाठी एक रहस्य होते. हा सामना आपण जिंकत नाही, हे भारताने आधीच ठरवले होते.”

हेही वाचा – U19 World Cup : टीम इंडिया आज खेळणार पहिली मॅच; समोर आहे ‘हा’ संघ; जाणून घ्या वेळापत्रक!

गावसकर म्हणाले, “अश्विनसाठी फील्ड प्लेसमेंट योग्य नव्हती. एकेरी धावा सहज निघत होत्या. पाच क्षेत्ररक्षक डीप होते. फलंदाज चान्स घेत होते. त्यामुळे बाद करण्याची हीच संधी होती.” गावसकर यांनी कठीण खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना उत्तम जिद्द दाखवल्याबद्दल आफ्रिका संघाचे कौतुक केले.

”परिस्थिती फलंदाजीसाठी अनुकूल नव्हती, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.”
“खेळपट्ट्या फलंदाजीसाठी सर्वोत्तम नव्हत्या, पण जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने दाखवलेला उत्साह, वाखाणण्याजोगा आहे. त्यातून संघाचे चारित्र्य दिसून आले”, असे गावसकर म्हणाले.