भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आफ्रिकन संघाने ४ धावांनी जिंकला. टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी २८८ धावांचे लक्ष्य होते, प्रत्युत्तरात टीम इंडिया फक्त २८३ धावा करू शकली. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतला.

पंत जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा संघाची धावसंख्या २ बाद ११६ धावा होती आणि संघाला ऋषभकडून विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी आवश्यक होती, परंतु पंतने ओव्हर डीप पॉईंटवरून अँडिले फेहलुकवायोच्या चेंडूवर फटका खेळला. पहिल्याच चेंडूवर पंतने असा फटका खेळला आणि सिसांडा मगालाकडे सोपा झेल दिला. पंतच्या विकेटनंतर कोहली चांगलाच संतापलेला दिसत होता.

हेही वाचा – ना विराट, ना रोहित..! स्मृती मानधनानं राखली भारताची लाज; दुसऱ्यांदा जिंकला ICCचा ‘मोठा’ पुरस्कार!

ऋषभ पंतच्या या फटक्यामुळे विराट आश्चर्यचकित झाला होता आणि पंतकडे रागाच्या भरात पाहत होता. खरे तर पंत अतिशय बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. संपूर्ण मालिकेत पंतने १०१ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात १७ आणि दुसऱ्या सामन्यात ८५ धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिवसीय मालिकेतील एकही सामना भारत जिंकू शकला नाही आणि आफ्रिकेने भारतावर ३-० विजय मिळवला. २०२० नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाला ३ किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. २०२० मध्ये न्यूझीलंडने भारताचा ३-० असा पराभव केला होता.