भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळायचे आहे. याआधी महिला संघ तिरंगी मालिका खेळत आहे, ज्यामध्ये त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २७ धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अमनजोत कौरने एक मोठ्या विक्रमाला गवसनी घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाज अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. तिने ३० चेंडूत ४१ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. या कारणास्तव तिला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यात भारतीय महिला संघाने ६ बाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकचा संघ ९ बाद १२० धावांच करु शकला.

पदार्पणातच अमनजोत कौर चमकली –

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अमनजोत कौर क्रिजवर येईपर्यंत भारतीय संघ रुळावर आला नव्हता आणि निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धावफलकावर फक्त ६९ धावा होत्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने संघाचा डाव सावरला. अमनजोत कौर पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी करताना ३० चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

७व्या क्रमांकावर ९ वर्षे जुना विक्रम मोडला –

सातव्या क्रमांकावर येताना, कौरने तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात ३- चेंडूंचा सामना केला आणि नाबाद ४१ धावा केल्या. तिच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर असलेल्या कोणत्याही महिला फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा हा नवा भारतीय विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता, जो तिने २०१४ मध्ये केला होता. तिने ३८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Mumbai vs Delhi Ranji Trophy: सरफराज खानची शतकी खेळी व्यर्थ; ४२ वर्षांत प्रथमच दिल्लीने मुंबईला चारली धूळ

गोलंदाजीत देविका-दीप्तीची कमाल –

फलंदाजीनंतर आफ्रिकन संघाची धुलाई करणाऱ्या दीप्ती शर्माने गोलंदाजीची धुरा सांभाळली. तिन इथेही धमाका केला. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने ४ षटकात ३० धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. तिच्याव्यतिरिक्त लेगस्पिनर देविका वैदने ३ षटकांत १९ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. आता भारतीय महिला संघाला २३ जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्धचा पुढील सामना खेळायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa womens amanjot kaur broke jhulan goswamis 9 year old record of 41 on debut vbm
First published on: 20-01-2023 at 14:07 IST