भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज बुधवारी खेळला जाईल. हा सामना काल मंगळवारी २७ जुलै रोजी खेळला जाणार होता, परंतु कृणाल पंड्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता या टी-२० मालिकेतून ९ भारतीय खेळाडू बाहेर पडले आहेत.

इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशन, सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाहीत. हे सर्वजण कृणालच्या संपर्कात होते, अशी चर्चा होती.

दिलासादायक बातमी म्हणजे, कृणालच्या संपर्कात असलेल्या आठ लोकांची पहिली करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सूत्रांनुसार आज बुधवारी दोन्ही संघांच्या खेळाडूंची पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. काही क्रिकेटपटू पूर्णपणे क्वारंटाइन आहेत आणि त्यांना मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळता येणार नाहीत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा – Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

श्रीलंकेच्या आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत, कृणाल ३० जुलैला उर्वरित भारतीय संघासह मायदेशी परत येऊ शकणार नाही. अनिवार्य क्वारंटाइन कालावधीनंतर त्याला निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणीची प्रतीक्षा करावी लागेल. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-२० सामना ३८ धावांनी जिंकला आहे.