आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांत कुलदीप यादवने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ते पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत. मोहम्मद कैफच्या मते, कुलदीप यादवने स्वत:ला सिद्ध केले आहे. तो म्हणाला की जेव्हा कुलदीप आयपीएलमध्ये केकेआर संघाचा भाग होता, तेव्हा अनेक वेळा त्याला संघासोबत मैदानावर आणले जात नव्हते. त्यामुळे तो त्याच्या हॉटेलच्या खोलीत राहत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर कुलदीप यादव अनेक मोसमात केकेआर संघाचा भाग होता. मात्र, शेवटी त्याची कामगिरी चांगली राहिली नाही आणि त्यामुळे त्याला संघात संधी मिळणेही बंद झाले. वरुण चक्रवर्तीच्या आगमनानंतर त्याला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जात होते. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग बनला आणि त्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. आता कुलदीप यादव आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली गोलंदाजी करत आहे.

१५ सदस्यीय संघात कुलदीप यादवलाही स्थान मिळाले नाव्हते – कैफ

मोहम्मद कैफच्या मते, कुलदीप यादव जेव्हा केकेआरमध्ये होता, तेव्हा त्याचा आत्मविश्वास खूपच कमी होता. स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान तो म्हणाला, ”कुलदीप यादव हा असा खेळाडू होता. ज्याला आयपीएल संघाच्या बसमध्येही बसू दिले जात नव्हते. केकेआर संघातही त्याची निवड झाली नव्हती. तो २५ सदस्यीय संघाचा भाग असायचा, पण त्याला १५ सदस्यीय संघात स्थान मिळत नव्हते.

हेही वाचा – IND vs NZ T20 Series: टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूच्या हाती असणार संघाची कमान

कैफ पुढे म्हणाला, त्याला मैदानात देखील आणले जात नव्हते. त्यावेळी तो खूप दुःखी आणि निराश झाला होता. पण त्याने प्रयत्न सुरूच ठेवले होते. यानंतर ऋषभ पंतने त्याला दिल्ली कॅपिटल्समध्ये खूप साथ दिली. तसेच आता येथे रोहित शर्मा देखील त्याला साथ देत आहे.”

हेही वाचा – IND vs SL 3rd ODI: भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यापूर्वी धक्का; ‘हा’ सदस्य बंगळुरुला रवाना

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात कुलदीप यादवने आपल्या शानदार कामगिरीने त्याने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. त्याने १० षटकात ५१ धावा देत ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl odi series kuldeep yadav was not even allowed to sit in the kkr team bus reveals mohammad kaif vbm
First published on: 13-01-2023 at 18:39 IST