गेल्या वर्षी पहिल्याच सत्रात आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्याने विजेतेपद मिळवून दिले. तेव्हा पासून हार्दिक पांड्याने मागे वळून पाहिले नाही. तसेच भारतीय संघाचे नेतृत्व करताना देखील त्याचा कर्णधारपदात ‘मोठा फरक’ दिसून आला आहे. हार्दिक याचे श्रेय फ्रेंचायझी प्रशिक्षक आशिष नेहराला दिले आहे.

आयपीएल २०२२ पूर्वी हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होता. मात्र तरी सुद्धा गुजरात संघाने पहिल्याच वर्षी या नामवंत अष्टपैलू खेळाडूला कर्णधार बनवून धाडसी पाऊल उचलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात वरिष्ठ स्तरावर केवळ एकदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या, पांड्याने मात्र आपल्या विरोधकांना चुकीचे सिद्ध केले. तसेच उत्तम नेतृत्व करताना एक चांगले उदाहरण सेट केले.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ ने जिंकल्यानंतर पांड्या म्हणाला, “गुजरातच्या दृष्टिकोनातून मी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षकासोबत काम केले ते महत्त्वाचे आहे. आमच्या मानसिकतेमुळे आशिष नेहराने माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवला. आम्ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असू शकतो परंतु क्रिकेटबद्दलचे आमचे विचार खूप समान आहेत.”

तो पुढे म्हणाला, “मी त्याच्यासोबत असल्यामुळे माझ्या कर्णधारपदात सुधारणा झाली. मला जे माहित आहे ते साध्य करण्यात मला मदत झाली. ते आश्‍वासन मिळण्यापुरतेच होते, एकदा मिळाले. मला नेहमी माहित असलेल्या खेळाबद्दल जागरूकता. हे मला आधीच माहित असलेल्या गोष्टी जाणून घेण्याबद्दल आणि समर्थन करण्याबद्दल होते. याचा मला नक्कीच उपयोग झाला आहे.”

हेही वाचा – IPL 2023 मधून बाहेर पडूनही ऋषभ पंतला मिळणार पूर्ण वेतन; डीसी नव्हे तर बीसीसीआय देणार पैसे, जाणून घ्या कारण

श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियात इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय निवडकर्त्यांनी संघात मोठे बदल केले.