Team India on World Cup 2023: विश्वचषक २०२३ला फक्त दोन महिने उरले आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यापूर्वी भारताला जास्तीत जास्त १० एकदिवसीय सामने खेळता येणार आहेत. असे असूनही टीम इंडियाची तयारी अपूर्ण असल्याचे दिसत आहे. अजूनही खेळाडूंना आजमावण्याचा टप्पा सुरू आहे. फलंदाजी क्रमवारीत प्रयोग केले जात आहेत. संघात कोणत्या १५ किंवा १६ खेळाडूंना संधी मिळेल याची कोणतीही ब्ल्यू प्रिंट नाही आणि अद्यापही हे ठरलेलेही नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविड केवळ नव्या खेळाडूंनाच आजमावत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इशानचा दावेदारी होणार पक्की

विश्वचषकासाठी फलंदाजीच्या दावेदारांची चाचणी घेण्याची भारतीय संघाची रणनीती आहे. मात्र, उसळत्या खेळपट्टीवर ह्या रणनीतीत सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. वेस्ट इंडिजने पावसाने खोडा घातलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. विश्वचषकाच्या अवघ्या १० सामन्यांपूर्वी रोहित आणि विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वचषकादरम्यान इशान किशन क्वचितच डावाची सुरुवात करेल, पण त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावून दुसरा यष्टिरक्षक (के.एल. राहुल विश्वचषकासाठी तंदुरुस्त असला तरी) म्हणून आपला दावा पक्का केला आहे.

हेही वाचा: IND vs WI: माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद टीम इंडियाच्या कामगिरीवर संतापला; म्हणाला, “पैसा आणि सत्ता असूनही…”

सूर्याचे संघातील स्थान धोक्यात

सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा वन डेत मोठी खेळी खेळता आली नाही. जोखीम घेणे हा सूर्याचा नैसर्गिक खेळ आहे, पण असा खेळ करून त्याने विश्वचषक स्पर्धेतील स्वतःची दावेदारी कमकुवत केली आहे. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजी तंत्रात बदल करण्याची गरज आहे. आगामी विश्वचषक २०२३साठी त्याची संघात निवड होणं अवघड आहे.

संजू-अक्षरची संधी हुकली?

दुसऱ्या सामन्यात १९ चेंडूत केवळ नऊ धावा करू शकणाऱ्या संजू सॅमसनबद्दल काही सांगता येत नाही आणि अक्षर पटेलनेही (१४ धावा) सुवर्णसंधी गमावली. डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचे कॉम्बिनेशन लक्षात घेऊन त्याला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. दोन्ही खेळाडू शॉर्ट पिच बॉल्ससमोर अडखळताना दिसले. अक्षर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजापेक्षा चांगला फलंदाज बनत आहे, त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. मात्र, या जागेवर तो अपयशी ठरला. आता भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत आहे.

हेही वाचा: MLC Final 2023: निकोलस पूरनचे वादळी शतक! अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले जेतेपद

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवरून सध्या खूप रस्सीखेच सुरूच आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती २०२३च्या विश्वचषक संघाची घोषणा पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे. त्याआधी भारताचा वेस्ट इंडीजविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ही राहुल द्रविड आणि रोहित शर्माला योग्य कॉम्बिनेशन ठरवण्याची शेवटची संधी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi surya or samson who will get place for world cup 2023 the picture can be clear after the third odi avw
First published on: 31-07-2023 at 13:21 IST