IND vs ZIM team India is facing problem due to water supply shortage in Harare vkk 95 | Loksatta

India Tour Of Zimbabwe: “आंघोळीसाठी कमी पाणी वापरा”; बीसीसीआयने खेळाडूंना का दिल्या सूचना?

Harare Water Supply Crisis: झिम्बाब्वेतील हरारे शहरात राहणार्‍या लोकांना आजवरच्या सर्वात भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

India Tour Of Zimbabwe: “आंघोळीसाठी कमी पाणी वापरा”; बीसीसीआयने खेळाडूंना का दिल्या सूचना?
फोटो सौजन्य – ट्विटर

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, तिथे पोहचलेल्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाण्याच्या वापराबाबत काही सूचना दिल्या आहेत. हरारे शहरातील पाणी टंचाईच्या समस्येमुळे बीसीसीआयला अशा सुचना देण्याची गरज भासली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना आंघोळीसाठी कमीत कमी पाण्याचा वापर करण्याची सूचना दिली आहे. याशिवाय, त्यांचे ‘पूल सेशन’ देखील रद्द केले आहे. इनसाईडस्पोर्ट्सने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खेळाडूंना त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत पाण्याचा अपव्यय करू नका आणि शक्य तितक्या कमी पाण्यात आंघोळ करा, असे त्यांना सांगितले आहे. पाण्याची बचत करण्यासाठी पूल सेशन रद्द करण्यात आली आहेत.”

झिम्बाब्वेतील मानवाधिकार कार्यकर्त्या लिंडा त्सुंगिराय मसारिरा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून पाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. “पश्चिम हरारेसह उर्वरित राजधानीत जवळपास तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा नाही. पाणी हे जीवन आहे, त्याच्या अनुपस्थितीमुळे लोकांचे आरोग्य आणि स्वच्छतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक जलस्वराज्य मंत्रालय आणि हरारे प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी,” असे ट्वीट लिंडा यांनी केले आहे.

हेही वाचा – “आवडत्या लोकांसोबत असूनही मी…”; मानसिक आरोग्याबद्दल विराट कोहलीचा मोठा खुलासा

झिम्बाब्वेतील हरारे शहरात राहणार्‍या लोकांना आजवरच्या सर्वात भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही परिस्थिती दुष्काळामुळे नाही, तर ‘मॉर्टन जाफ्रे वॉटर ट्रीटमेंट वॉटरवर्क्स’ येथील पाणी पुरवठा प्रकल्पातील पाणी प्रक्रिया रसायने संपल्यामुळे निर्माण झाली आहे. या गोष्टीचा फटका तिथे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघालाही बसला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आवडत्या लोकांसोबत असूनही मी…”; मानसिक आरोग्याबद्दल विराट कोहलीचा मोठा खुलासा

संबंधित बातम्या

IND vs BAN ODI: के. एल. राहुलचा ऋषभ पंतबाबत मोठा खुलासा, म्हणाला “BCCI ने पंतला संघातून काढताना एक..”
‘तो’ झेल सुटला अन् भारताचा खेळ खल्लास, भर मैदानातच कर्णधार रोहित शर्मा भडकला, Video होतोय तुफान Viral
विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे?
हार्दिक पांड्या नव्हे, तर ‘या’ खेळाडूला मनिंदर सिंगने सुचवले रोहितचा उत्तराधिकारी, कोण आहे घ्या जाणून
Abu Dhabi T10 League 2022: डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सवर मात करून दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: पारंपरिक थाट, शाही विवाहसोहळा अन् समुद्रकिनारीच अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; आशय कुलकर्णीचा वेडिंग व्हिडीओ समोर
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा
बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा
IND vs BAN: “निश्चित-अनिश्चिततेच्या खेळात तुम्हाला अनपेक्षिततेची…” भारताच्या पराभवावर केएल राहुलने सोडले मौन
मुंबई: दुचाकीच्या धडकेने ५६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू ; दुचाकीस्वाराला अटक