INDW vs SLW Women’s Cricket World Cup Updates in Marathi: महिला एकदिवसीय विश्वचषकाला आज ३० सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. स्पर्धेत यजमान भारताचा पहिलाच सामना श्रीलंकेशी होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली असून प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. पावसामुळे सामन्यात दोन वेळा व्यत्यय आला आणि सामन्याची षटकंही कमी झाली आहे. पण पहिल्याच सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांची परिक्षा घेतली. पण भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मात्र श्रीलंकेच्या मेहनतीवर पाणी फेरलं
भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात १५० धावाही न करता ६ विकेट्स गमावले आहेत. श्रीलंकेची फिरकीपटू रानावीरा हिने ४ विकेट्स घेतले आहेत. तिच्या फिरकीपुढे भारताचे फलंदाज फार काळ मैदानावर टिकू दिले नाहीत. पावसामुळे सामना तीन वेळा थांबल्यामुळे गुवाहाटीमध्ये खेळवला जाणारा पहिलाच वर्ल्डकप सामना ५० ऐवजी ४७ षटकांचा करण्यात आला. भारताकडून दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांनी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. तर स्नेह राणासह दीप्तीने महत्त्वपूर्ण ४२ धावांची भागीदारी केली. यासह भारताने पहिल्याच सामन्यात ७ विकेट्स गमावत २६९ धावा केल्या.
भारताकडून सलामीसाठी स्मृती मानधना आणि प्रतिका रावलची जोडी सलामीसाठी उतरली. प्रतिकाने पहिल्या षटकात चौकार लगावत सुरूवात केली. पण नंतर भारताला धावांसाठी झगडावं लागलं. स्मृती मानधना ८ धावांवर बाद झाली आणि भारताला पहिलाच मोठा धक्का बसला. यानंतर प्रतिका व हरलीनने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण प्रतिकाने विकेट्स गमावल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडबडला.
कर्णधार हरमनप्रीतने येऊन झटपट धावा करायला सुरूवात केल्या. हरलीनने पण तिला चांगली साथ दिली. पण हरलीन रानावीराच्या २६व्या षटकात पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. रानावीराच्या दुसऱ्या कमालीच्या चेंडूवर जेमिमा रोड्रिग्ज गोल्डन डकवर क्लीन बोल्ड झाली. तर याच षटकात पाचव्या चेंडूवर हरमनप्रीत कौरही झेलबाद झाली आणि भारताला अजून एक मोठा धक्का बसला.
सलग तीन विकेट्स गमावल्यानंतर २६ षटकांत भारताची धावसंख्या ६ बाद १२४ आहे. भारतीय संघाला सामन्यात टिकून राहण्यासाठी २०० अधिक धावा तरी कराव्या लागणार आहेत. हरमननंतर आता दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरची जोडी मैदानावर उतरली आहे.
अमनजोत कौरने कमालीची फटकेबाजी करत ५६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या आहेत. तर दीप्ती शर्मा ५३ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर स्नेह राणाने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावांची उत्कृष्ट खेळी करत भारताची धावसंख्या २६० च्या पुढे नेली. यासह श्रीलंकाला विजयासाठी भारताने २७० धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेकडून रानावीराने ४ विकेट्स, प्रबोधनीने २ विकेट्स तर कुलासूर्या आणि चमारीने १-१ विकेट घेतल्या.