भारतीय पुरुष संघाने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५-१ अशी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्याची सुरुवात बांगलादेशच्या गोलने झाली. त्यांचा हा गोल सातव्या मिनिटाला हसन झुबेर याने केला. मात्र त्यानंतर हरजितसिंग याने भारताचा पहिला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ भारताच्या युवराज वाल्मीकी (१२वे मिनिट), एस.के.उथप्पा (२०वे मिनिट), देवेंद्र वाल्मीकी (२४वे मिनिट) यांनी गोल करीत पूर्वार्धात ४-१ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात अफान युसुफने ४१व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल नोंदविला. देवेंद्र वाल्मीकी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
हॉकी : भारताची विजयी आघाडी
भारतीय पुरुष संघाने ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५-१ अशी मात करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
First published on: 09-08-2014 at 02:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat bangladesh 5 1 to win hockey test series