Jatin Paranjpe On Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याआधी अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आपला शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. कर्णधार असूनही त्याने शेवटच्या कसोटी सामन्यातून स्वतःला ड्रॉप केलं. त्यामुळे मेलबर्नच्या मैदानावर झालेला सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. भारताचे माजी निवडकर्ते जतीन परांजपे हे देखील या निर्णयामुळे आश्चर्चकित झाले होते. दरम्यान आता त्यांनी रोहितच्या निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

‘अ सेंच्युरी ऑफ स्टोरीज’ या पॉडकास्टमध्ये बोलताना जतीन परांजपे यांनी रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले,“ ज्यावेळी तो कसोटी सामना खेळत नव्हता त्यावेळी त्याने सांगितलं होतं की, मी क्रिकेटची सुरुवात रेड बॉल क्रिकेटपासून केली होती. मग मला कसोटी क्रिकेटमध्ये रस नाही, हे तुम्ही कसं बोलू शकता की?

तसेच ते पुढे म्हणाले की, “ रोहित कसोटी क्रिकेट आवडायचं. मला तरी हेच वाटतं की, तो कसोटी क्रिकेटमध्ये आणखी चांगलं करू शकला असता. सिडनी कसोटीत तो स्वतः बाहेर बसला. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. कारण आपण त्या मालिकेत बरोबरी करू शकलो असतो.”

सिडनी कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवला असता तर भारतीय संघ या मालिकेत बरोबरी करू शकला असता. पण रोहितने आऊट ऑफ फॉर्म असल्यामुळे बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. त्यावेळी देखील रोहित निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रोहितने स्पष्टपणे नकार दिला होता. तो म्हणाला होता की, “ मी कुठेच जाणार नाही. पण २ महिन्यानंतर त्याने पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.” रोहित शर्माला भारतीय संघाकडून ६७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे. तो इथून पुढे केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.