मार्च महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळल्यामुळे भारतीय फुटबॉल संघाच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण झाली असून भारत १४७व्या स्थानी पोहोचला आहे. विम कोएव्हरमन यांच्या प्रशिक्षकपदाखालील भारताने आशियाई देशांमध्ये २५वे स्थान कायम राखले आहे. भारतीय संघ या वर्षी फक्त एकच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला असून त्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली होती. स्पेनने अग्रस्थान कायम राखले असले तरी फिफा विश्वचषकाचे संयोजन करणारा ब्राझील संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जर्मनी आणि पोर्तुगाल अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.