Ramiz Raja blames India’s ‘BJP mindset’: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षपदावरून काढून त्यांच्या जागी नजम सेठी यांची नियुक्ती झाली आहे. यानंतर माजी पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी नवे अध्यक्ष सेठी आणि बोर्डाच्या विरुद्ध अनेक वादग्रस्त विधाने केली आहे. ज्यावरून रमीझ राजा यांच्या विरुद्ध क्रिकेट बोर्डाने खटला दाखल करण्याची नोटीस सुद्धा दिली आहे.

भारतात भाजपाची मानसिकता..

रमीझ राजा यांनी आता पुन्हा एकदा खळबळजनक विधान करत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण यावेळी त्यांनी भारताला लक्ष्य केले. भारतात फक्त भाजपाची मानसिकता पसरली आहे. PJL असो किंवा पाकिस्तान महिला लीग यांची घोषणा मी केली त्याचा हेतू इतकाच होता की आयसीसीवर अवलंबून न राहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे स्वतः पैसे कमावण्याची संधी येईल. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, लाहोर येथे सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना राजा यांनी भारताविरुद्ध असे विधान केले होते.

our identity is hindu say rss chief mohan bhagwat
अभिमानाने म्हणा आपण हिंदू आहोत! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

रमीझ राजा म्हणाले की “आमच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाते कारण आयसीसीची बहुतेक संसाधने भारतात तयार केली जातात. जर भारताची मानसिकता पाकिस्तानला मागे टाकण्याची असेल तर आम्ही ना इकडे राहू, ना तिकडे”.

ICC मध्ये भारताला पर्याय हवा

याविषयी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्याचे सुद्धा राजा यांनी म्हंटले. राजा म्हणाले, “आम्ही पाकिस्तानच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आयसीसी, क्रिकेटच्या प्रशासकीय मंडळामध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडने नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्याची विनंती केली होती. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानसाठी टीम इंडियाने पाकिस्तानात न येण्याची भूमिका घेतली तर आमच्याकडेही पर्याय आहेत असे राजा पुढे म्हणाले.

बाबर आझमला म्हणालो, भारताला हरवा..

दरम्यान, रमीझ राजा यांनी बाबर आझम सह झालेल्या चर्चेविषयी सुद्धा माहिती दिली. राजा म्हणाले “आझमला इतकेच सांगितले की भारताकडून हरणे हा पर्याय नाही.आपल्याला भारताला हरवायचे आहे कारण तेव्हाच आपण वाटाघाटी करण्यासाठी मजबूत स्थितीत असू”

याच चर्चेत राजा यांनी पुन्हा एकदा पीसीबीला टार्गेट केले होते. “संविधानाला बुलडोझर लावून मागच्या दारातून आत यायचं आणि क्रिकेट बोर्डावर कोणालातरी लादायचं, मला वाटते की हा सर्वांवर अन्याय आहे. सोशल मीडिया रिपोर्ट्समध्ये काय बरोबर किंवा चुकीचे आहे ते ठरवले जाते आणि मला वाटते की हे बदलणे आवश्यक आहे”असे राजा यांनी म्हंटले आहे.