scorecardresearch

IND vs AUS Test: टीम इंडियाने रचला सर्वात मोठा विक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच संघ

IND vs AUS Test Series: भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून सलग १६ वी मालिका जिंकली आहे. जाणून घ्या टीम इंडियाने कोणत्या संघांचा पराभव केला.

India Wins 16th Test Series in a Row
टीम इंडिया (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

IND vs AUS Test Updates: बॉर्डर-गावसकर करंडक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या मैदानावर पार पाडला. हा चौथा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत २-१ असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १६ वी मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम एक विक्रम केला. भारताने सलग चौथी बॉर्डर-गावसकर करंडक जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने मालिका जिंकली –

टीम इंडियाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकली. टीम इंडियाने पहिल्या दोन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलग पराभव केला. मात्र तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदाबादमध्ये खेळली गेलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली. अशा प्रकारे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून सलग चौथी मालिका जिंकली.

हेही वाचा – LLC 2023: ६,६,६..दोहामध्ये ख्रिस गेलचा कहर! एकाच षटकात पाडला षटकारांचा पाऊस, पाहा VIDEO

टीम इंडियाने या संघांना घरच्या मैदानावर पराभूत केले –

ऑस्ट्रेलियाचा ४-० ने पराभव केला
वेस्ट इंडिजचा २-० ने पराभव केला
दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने पराभव केला
न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला
इंग्लंडचा ३-० असा पराभव केला
बांगलादेशचा १-० ने पराभव केला
ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला
श्रीलंकेचा १-० ने पराभव केला
अफगाणिस्तानवर १-० ने मात केली
वेस्ट इंडिजचा २-० ने पराभव केला
दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने पराभव केला
बांगलादेशचा २-० ने पराभव केला
इंग्लंडचा ३-१ ने पराभव केला
न्यूझीलंडचा १-० ने पराभव केला
श्रीलंकेचा २-० ने पराभव केला
ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला

हेही वाचा – IPL 2023: विराटचा आयपीएलच्या प्रोमो शूटचा VIDEO व्हायरल; गोंगाटात कोहली दिसला वेगळ्या अंदाजात

सलग १६ मालिका जिंकण्याचा विक्रम –

नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात, भारतीय संघाने २०१३ पासून सलग १५ कसोटी मालिका जिंकल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत करून आपला सलग १६ वा मालिका विजय नोंदवला. हे करत टीम इंडिया सलग १६ कसोटी मालिका जिंकणारा जगातील एकमेव संघ बनला आहे. जगातील इतर कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर सलग १० पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकलेल्या नाहीत. या बाबतीत भारत आधीच नंबर वन संघ होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 17:39 IST
ताज्या बातम्या