फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या लाजवाब गोलंदाजीच्या बळावर भारताने संयुक्त अरब अमिरातीचा ४६ धावांनी पराभव केला आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या उदयोन्मुख संघांसाठीच्या (२३ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेत भारताने अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ४९.५ षटकांत सर्व बाद २०८ धावा केल्या. भारताकडून मनप्रीत जुनेजाने सर्वाधिक ७६ धावा केल्या. जुनेजाने लोकेश राहुल (४३) याच्यासोबत ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा डाव ४८.३ षटकांत १६२ धावांत गुंडाळला. १ बाद ९७ अशा सुस्थितीत असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या डावाला १९ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज पटेलने खिंडार पाडले. त्याने ८.३ षटकांत २९ धावांत ४ बळी घेतले. गुरुवारी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा २८ धावांनी धक्कादायकरीत्या पराभव केला होता.
दुसरीकडे पाकिस्तानने श्रीलंकेचा एक विकेट राखून पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.