scorecardresearch

Premium

सुलतान जोहर चषक – भारताकडून न्यूझीलंडचा 7-1 ने धुव्वा

भारताचा स्पर्धेतला सलग दुसरा विजय

गोल झळकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू
गोल झळकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू

भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर चषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने न्यूझीलंडवर 7-1 ने मात केली, सलामीच्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाला 2-1 ने हरवलं होतं. भारताकडून प्रभजोत सिंह, शैलेंद्र लाक्रा, हरमनजीत सिंह, मोहम्मद फराज, अभिषेक आणि कर्णधार मनदीप मोर यांनी गोल झळकावले. न्यूझीलंडकडून सॅम हिहाने एकमेव गोल केला.

भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीलाच आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. याचा फायदा भारताला झालेला पहायाल मिळाला, प्रभजोत सिंहने 6 व्या मिनीटाला भारताचं खातं उघडलं. या गोलमुळे न्यूझीलंडचा संघ सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच बॅकफूटवर ढकलला गेला. यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. मधल्या काही काळात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी काही चांगल्या चाली रचत भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलकिपर पंकज रजकने त्यांचे मनसुबे उधळून लावले. अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने एकमेव गोल करत सामन्यात आपली इज्जत राखली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना जपानशी होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India maul new zealand 7 1 in sultan of johor cup hockey

First published on: 08-10-2018 at 08:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×