टी-२० विश्वचषक २०२४ येत्या २ जूनपासून खेळवला जाणार आहे. प्रथमच या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतानेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने टी-२० फॉरमॅटमधील जर्सी बदलत नवी जर्सी लाँच केली आहे. या नव्या जर्सीचे हटके अंदाजात व्हीडिओ शेअर करत लाँच केली आहे.

भारताच्या या नव्या जर्सीवर चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत ट्रोल केले आहे. आदिदासने व्हीडिओ शेअर करत ही नवी जर्सी लाँच केली आहे. तर बीसीसीआयने आदिदासची ही पोस्ट शेअर केली आहे. टीम इंडियाची नवीन जर्सी निळ्या आणि भगव्या रंगाची आहे. कॉलरवर तिरंग्याचे पट्टे आहेत. तर हात भगव्या रंगाचे आहेत. जर्सीच्या मध्यभागी टीम इंडिया असे लिहिलेले आहे. ही जर्सी हेलिकॉप्टरद्वारा लाँच केली आहेत. जर्सी लाँच होत असताना रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा मैदानात होते.

भारताची नवी टी-२० जर्सी ट्रोल

भारताच्या या नव्या जर्सीचा व्हीडिओ व्हायरल होत असला तरी चाहत्यांनी मात्र कमेंट्समध्ये पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी या जर्सीला बरीच नाव ठेवली असून फार ट्रोल केले आहे. जर्सीवर निळ्या रंगापेक्षा भगवा रंग अधिक असल्याचे पाहून भाजपाची जर्सी असल्याचे काही जणांनी म्हटले आहे. तर नव्या जर्सीला राजकारणाशीही काही जणांनी जोडले. तर जर्सीच्या मधोमध भारताच्या नावापेक्षा Dream 11 चे नाव मोठे असल्याने त्यावरही टिपण्णी करण्यात आली आहे. ४ मे ला म्हणजेच काल या जर्सीचे फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर लगेचच आज ५ मे ला या नव्या टी-२० जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र यादव चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.