टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असलं तर अजूनही भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा काही संपत नाही. सुपर १२ फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून मात दिली. आता या सामन्याची पुन्ही एकदा चर्चा रंगू लागली आहे. भारत पाकिस्तान सामना विक्रमी संख्येने पाहिला गेल्याचं समोर आलं आहे. जवळपास १६७ दशलक्ष लोकांनी हा सामना पाहिला आहे. टी २० २०१६ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारत वेस्ट इंडिज सामन्याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारत वेस्ट इंडिज सामना १३६ दशलक्ष लोकांनी पाहिला होता.

“भारत पाकिस्तान सामन्याने १६७ दशलक्ष प्रेक्षकांचा विक्रम नोंदवून इतिहास रचला आहे. आतापर्यंत सर्वाधिक लोकांनी पाहिलेला टी २० मध्ये पाहिला सामना आहे.”, असं स्टार इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितलं. “सामन्याचा निकाल आणि भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आहे, यात शंका नाही. मात्र विक्रमी प्रेक्षकसंख्या अभूतपूर्ण प्रमाणात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची क्रिकेटची अनोखी शक्ती दर्शवते.”, असंही निवेदनात पुढे सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात सुपर १२ फेरीतील प्रेक्षकसंख्या २३८* दशलक्ष नोंदवण्यात आली होती.

T20 WC:न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने २०१९ वर्ल्डकपचा उल्लेख करत सांगितलं; “उपांत्य फेरीत आम्ही इंग्लंडला…”

भारत पाकिस्तान सामना
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं.