भारतीय हॉकी संघाने युरोप दौऱ्यात डच हॉकी क्लबला ३-३ असे बरोबरीत रोखले. नेदरलँड्समध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. डच क्लबने २४ व्या मिनिटालाच २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर वेगवान चाली करीत हा सामना अनिर्णित ठेवण्यात भारतास यश मिळाले. भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपींदरपाल सिंग याने सामन्याच्या ५० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा संघाचे खाते उघडले. पाठोपाठ निक्किन थिमय्या याने ५६ व्या मिनिटाला गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. ६३ व्या मिनिटाला व्ही. आर. रघुनाथ याने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करीत भारताची ३-२ आघाडी अशी वाढवली. मात्र पुढच्याच मिनिटाला डच क्लबने बरोबरी साधली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2014 रोजी प्रकाशित
भारतीय हॉकी संघाची डच क्लबशी ३-३ने बरोबरी
भारतीय हॉकी संघाने युरोप दौऱ्यात डच हॉकी क्लबला ३-३ असे बरोबरीत रोखले. नेदरलँड्समध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता.
First published on: 16-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India play 3 3 draw against dutch club