शुक्रवार १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर BCCI नं टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून सुरु होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी असेल प्लेइंग इलेव्हन!

बीसीसीआयनं जाहीर केलेली भारताची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे:

विराट कोहली (कर्णधार)
अजिंक रहाणे (उपकर्णधार)
रोहित शर्मा
शुभमन गिल
चेतेश्वर पुजारा
ऋषभ पंत<br /> रविचंद्रन अश्विन
रविंद्र जाडेजा
जसप्रीत बुमराह
इशांत शर्मा<br /> मोहम्मद शमी

 

सध्या जाहीर करण्यात आलेल्या संघानुसार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी आघाडीला मैदानात उतरेल. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी येईल. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर. अश्विन, नवव्या क्रमांकावर मोहम्मद शमी, दहाव्या क्रमांकावर इशांत शर्मा आणि अकराव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असेल. कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन मोहम्मद सिराजला या संघात स्थान देण्यासाठी आग्रही होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याला संघात स्थान मिळालेलं नाही.

न्यूझीलंडचा संघ आधीपासूनच इंग्लंडमध्ये!

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आला आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॉथम, डॅवोन कोनवे ही जोडी आघाडीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार केन विलियमसन, चौथ्या क्रमांकावर रॉस टेलर, पाचव्या क्रमांकावर विल यंग फलंदाजीसाठी येतील. तर सहाव्या स्थानावर यष्टीरक्षक फलंदाज वीजे वाटलिंगल मैदानात उतरेल. वाटलिंगचा हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. सातव्या क्रमांकावर कायल जेमिसन, आठव्या क्रमांकावर एजाज पटेल, नवव्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट, दहाव्या क्रमांकावर टिम साउथी आणि अकराव्या क्रमांकावर नील वॅगनर मैदानात उतरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India playing 11 for wtc final declared by bcci against new zealand pmw
First published on: 17-06-2021 at 19:44 IST